NCP : साहेबांनी आम्हाला एकत्र बसवून पॅचअप करावं, आमदार दिलीप बनकरांची साद…

NCP : साहेबांनी आम्हाला एकत्र बसवून पॅचअप करावं, आमदार दिलीप बनकरांची साद…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आम्हांला एकत्र बसवून पॅचअप करावं, अशी भावनिक साद नाशिकमधील निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकरांनी घातली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये टीका-टीपण्यांचं सत्र सुरु असतानाच आता नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी पुन्हा पॅचअप करण्याचं आवाहन केलंय.

भाजप सरकारला पाठिंबा दिला, तरीही दणका बसलाच; शिखर बँक प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढणार?

दिलीप बनकर म्हणाले, यापूर्वीही 2014 साली बाहेरुन भाजपला पाठिंबा देऊन राज्यात सरकार स्थापन करण्याबाबतची भूमिका शरद पवार घेत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर शिवसेनेसोबत कधीही युती होऊ शकत नसतानाही पवारांनी 2019 मध्ये सेनेशी युती केली होती. त्यामुळे आता सरकारमध्ये सामिल होऊन मतदारसंघातल्या जनतेची काम करणं हे आमचं काम असल्याचं बनकर यांनी सांगितलं आहे.

लग्न झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन, खडसेंनी दादांना सोडलं अन् फडणवीसांनाच धरलं…

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून बनकर आणि पवार कुटुंबियांचं नातं आहे. हे नातं टिकावं हीच आमची अपेक्षा असून राष्ट्रवादीत फुट पडू नये, अशीच आमची भूमिका आहे. शरद पवार आमच्या पक्षाचे अध्यक्ष असून आता पुढील काळात आमच्या आणि त्यांच्या चर्चा होत राहतीलच.

Ajit Agarkar; मराठमोळा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष, बीसीसीआयची घोषणा

पहाटेच्या शपविधीवेळीही राष्ट्रवादी पक्ष सरकारसोबत असावा हीच आमची अपेक्षा होती, जनतेची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत असणं गरजेचं असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होतं. आत्ताही आम्ही तेच सांगणार असल्याचं बनकर म्हणाले आहेत.

BMC Election : आम्ही 150 जागा जिंकणार; फडणवीसांनी सांगितला बीएमसी निवडणुकीचा महिना

दरम्यान, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठीच प्रयत्न करणार असून जनतेची प्रलंबित विकासकामे पूर्ण होतील, असा आमचा आशावाद आहे, त्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याचा विश्वास दिलीप बनकर यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत तो त्यांचा प्रश्न असून शरद पवार साहेबांनी आमच्या सोबत पॅचअप केले पाहिजे, सर्वांना एकत्र बसवून चर्चा करून साहेबांनी पॅचअप केले पाहिजे, पवार कुटूंब एकत्र राहिले पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं बनकरांनी सांगितंल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube