लग्न झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन, खडसेंनी दादांना सोडलं अन् फडणवीसांनाच धरलं…

लग्न झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन, खडसेंनी दादांना सोडलं अन् फडणवीसांनाच धरलं…

अविवाहिताचं लग्नही झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन दररोज, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडेतोड भाष्य करीत टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीत वाय. बी. सेंटरमधून ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

‘आज या दारात.. उद्या त्या दारात.. लोकांना काय तोंड दाखवणार?’ रोहित पवारांनी बंडखोरांना फटकारलं!

खडसे म्हणाले, जे लोकं विरोधात गेले ते ईडीमुळे तर सत्तेच्या लालसेपोटी गेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडे बहुमत असतानाही फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार फोडले आहेत. देशात भाजपकडून फोडाफोडीचेच राजकारण सुरु आहे. आता फडणवीस सरकारच्या दोन बायका आहेत. मी फडणीसांना जेवढं पाहिलंय तेवढं एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पाहिलेलं नसल्याचं ते म्हणाले आहेत.

NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले

तसेच मी भाजपमध्ये असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. फडणवीस आता मुख्यमंत्रीनंतर फौजदाराचा हवालदार झाला आहे. विदर्भाच्या आंदोलनावेळी विदर्भ वेगळं झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. पण आता तर टीका केलेल्यांनाच तुम्ही वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ केलं असल्याचं म्हणत टीका केलीय. दरम्यान, राजकारणात खूप काही घडून गेलं पण शेवटी मला शरद पवारांनीच आश्रय दिला असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया-रणवीरची रोमँटिक केमिस्ट्री; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर आऊट

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंपच झाला आहे. अजित पवारांच्या या कृतीला समर्थन न देता सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटत शरद पवार मैदानात उतरले आहेत. फुटीनंतर दोन्ही गटांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटाकडून प्रदेश कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका आज मुंबईत सुरु आहेत. या बैठकीतून अजित पवार गटासह शरद पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, टीकांचे सत्र सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube