BMC Election : आम्ही 150 जागा जिंकणार; फडणवीसांनी सांगितला बीएमसी निवडणुकीचा महिना
Devendra Fadanvis On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते एएनआय या वृत्तसंसंथेच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. 29 जून रोजी त्यांनी ही मुलाखत एएनाआयला दिली. (Devendra Fadanvis On BMC Election )
मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही लांबवली नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अनेक याचिका दाखल केल्यामुळेच निवडणुका लांबल्या आहे, असा आरोप फडणवीसांनी ठाकरे गटावर केला आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतं. उद्ध ठाकरेंच्या पक्षाने न्यायालयात भरपूर याचिका दाखल केल्या आहे. आरक्षणाबाबतची एक याचिका देखील आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहे आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही. तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका केल्या आहे. तुम्ही याचिका मागे घ्या. दोन्ही बाजूंनी का बोलता. हे राज्य सरकारच्या हातात नाही.
‘मुंबईत 150 जागा जिंकणार’
जेपी नड्डा यांनी दिलेला मुंबई 150 चा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार. हिंदुत्व हा निवडणुकीचा मुद्दा नाही. ती आमची विचारधारा आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यावर आम्ही मतं मागत नाही, विकासाच्या मुद्द्यावर मागतो. मागच्या निवडणुकीतही आम्ही मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण प्रचारामध्ये मी विकासाचा मु्द्दा मांडत होतो, असं फडणवीसांनी सांगितलं.
BMC elections are delayed because.. And in upcoming BMC elections we will surely win 150+ seats !
बीएमसीची निवडणूक यामुळे लांबली आहे..
आणि महायुती 150+ जिंकणारच !
आगामी बीएमसी चुनाव इस वजह से नहीं हो रहा है..
और में हम निश्चित रूप से 150+ सीटें जीतेंगे!
(29/6/23) #Maharashtra… pic.twitter.com/f7NMhimIkk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2023
शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!
In 2024, BJP – Shiv Sena will contest on their own party symbols; Hon. Modi ji will campaign for both parties.
2024 मध्ये भाजपा-शिवसेना आपल्या पक्षांच्या चिन्हांवर लढणार; मा. मोदीजी दोन्ही पक्षांचा प्रचार करणार!
2024 में बीजेपी-शिवसेना अपने-अपने चुनाव चिन्ह पर लड़ेंगी चुनाव; मा.… pic.twitter.com/99RkKpo1Vw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2023
‘आगामी निवडणुक शिवसेनेसोबतच लढणार’
तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही शिवसेनेसोबत लढणार आहोत. तसेच 2024 ची निवडणुक शिवसेना त्यांच्याच चिन्हावर लढविणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. शिवसेना व भाजप या दोघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करणार, असे त्यांनी म्हटले होते.