भाजप सरकारला पाठिंबा दिला, तरीही दणका बसलाच; शिखर बँक प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढणार?

भाजप सरकारला पाठिंबा दिला, तरीही दणका बसलाच; शिखर बँक प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढणार?

Maharashtra State Cooperative Bank Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. रोजच खळबळजनक घटना घडत आहेत. त्यातच आता शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यती असल्याची बातमी धडकली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जे आरोपपत्र दाखल केले होते त्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने दखल घेतली आहे. या बरोबरच जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कवडीमोल दराने संपादीत केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.

NCP : तुम्हाला काय कमी केलं होतं? मिळालेली पद सांगत रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी ने एप्रिल महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. याच आरोपपत्राची आता न्यायालयाने दखल घेतली आहे. कोर्टाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. या प्रकरणी संबंधितांना समन्सही बजावण्यात आले आहेत. त्यामुळे नुकतेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपपत्रात नेमकं काय ?

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, महाराष्ट्र शिखर बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव केला. त्यावेळी हा कारखाना मुंबईतील कंपनीने खरेदी केला. पुढे कंपनीने कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या कंपनीला दिला. या कंपनीची मालकी स्पार्किंग सॉईल प्रा. लि.कडे आहे. याच स्पार्किंग सॉईलमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संचालक होत्या.

हा कारखाना अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपनीलाच कसा दिला गेला, असा सवाल कोर्टाने केला आहे. शिखर बँकेनेही कारखान्याला वेळोवेळी कर्ज दिले. मात्र, 80 कोटी रुपयांची थकबाकी असतानाही कारखान्याचा लिलाव केला गेला. लिलावानंतर याच कारखान्याच्या नावाने सुमारे 826 कोटी रुपये गुरू कमोडिटीज कंपनीला देण्यात आले. या सर्व अफरातफरी अजित पवारांच्या निकटवर्तीयांना फायदा होण्यासाठी केल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती देशपांडे यांनी नोंदवले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube