Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल

Kerala News : देशात अनेक ठिकाणी शहरांची जिल्ह्यांची नावे बदलण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यानंतर आता अशीच एक बातमी दक्षिणेतील राज्यातून आली आहे. येथे तर राज्याचेच नाव बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. Smriti Irani : जर गांधी कुटुंबात […]

Kerala

Kerala

Kerala News : देशात अनेक ठिकाणी शहरांची जिल्ह्यांची नावे बदलण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यानंतर आता अशीच एक बातमी दक्षिणेतील राज्यातून आली आहे. येथे तर राज्याचेच नाव बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

दक्षिण भारतातील हे राज्य आहे केरळ. केरळ राज्याच्या नावात बदल करून लवकरच या राज्याचे नाव ‘केरलम’ असे करण्यात येणार आहे. यासाठी केरळ विधानसभेत सर्वसंमतीने प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रस्ताव सादर केला. केरळ राज्याला मल्याळम भाषेत केरलम म्हटले जाते. मात्र अन्य भाषांत अजूनही केरळ असेच म्हटले जाते, असे मुख्यमंत्री विजयन म्हणाले. मु्ख्यमंत्री विजयन यांनी विधानसभेत कलम 118अ अंतर्गत प्रस्ताव सादर केला.

याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारला माहिती देत सरकारी कागदपत्रांत नव्या नावानुसार बदल करावा अशी विनंती केली. काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडी युडीएफनेही हा प्रस्ताव बिनशर्त स्वीकारला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव सर्वसंमतीने पारित झाल्याची घोषणा केली.

दरम्यान, मल्याळम भाषेत केरळला केरलम असे म्हटले जाते. मात्र राज्यातील केरळी नागरिकांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी राज्याचे नाव केरळ असेच म्हटले जाते. त्यामुळे नावात बदल करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आज विधानसभेत चर्चा होऊन त्यानुसार निर्णय घेण्यात आला. विधानसभेतच प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्याच्या नावात लवकरच बदल होणार आहे.

Exit mobile version