Download App

करोडो बहिणींना मोदी सरकारची रक्षाबंधन भेट; घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची घट

LPG Rate : महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. कांद्याची संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातशुल्क लावून भाव नियंत्रणात आणले. त्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती थेट 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला.
Aditya L1 : इस्त्रोचे आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाईल? आपल्याला काय फायदा होणार?

हा लाभ फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. पुढील काही महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. देशात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचे रेट याआधी मार्च 2023 मध्ये बदलले होते. त्यावेळी गॅसच्या किंमती 50 रुपयांनी वाढविण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसच्या किंमती 200 रुपयांनी कमी होतील. या योजनेचा फायदा उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना होईल. या लाभार्थ्यांना आधीचेच 200 रुपये अनुदानाच्या रुपात मिळत आहेत. आता या पद्धतीने त्यांच्या खात्यात 400 रुपये जमा होतील.

सध्या राजधानी दिल्ली शहरात विनाअनुदानित गॅस सिलिंडर 1103 रुपयांना मिळत आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 400 रुपये जमा होतील. म्हणजेच या लाभार्थ्यांना आता 703 रुपयांतच गॅस मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुकेश अंबानींनी घोषणा केलेले जिओ एअर फायबर नेमकं काय? किती पैसे मोजावे लागणार?

मागील तीन वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी गॅसची किंमत 594 रुपये होती. त्यानंतर डिसेंबर 2020 रोजी 644 रुपये झाली. 15 डिसेंबर 2020 रोजी 694 रुपयांपर्यंत किंमती वाढल्या. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये तीन वेळा किंमती वाढल्या. एप्रिल महिन्यात दहा रुपये किंमती कमी झाल्या होत्या. जुलै 2021 रोजी किंमती वाढून 834 रुपये झाली. यानंतर 17 ऑगस्ट 2021 रोजी घरगुती गॅसच्या किंमती 859.50 रुपये झाल्या. यानंतर किंमती आणखी वाढत राहिल्या.

 

Tags

follow us