Download App

‘परदेशात खोटे बोलायचे आणि भारतात आल्यावर..! ; राहुल गांधींच्या अटींवर मंत्री ठाकूर संतापले

Rahul Gandhi :  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी बाहेरच्या देशात जाऊन म्हणतात की आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माफी मागण्याऐवजी ते म्हणतात की आम्हाला बोलू द्या मात्र, त्यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे अशी मागणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

ते म्हणाले, की काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील उपस्थिती अन्य खासदरांच्या तुलनेत सरासरी हजेरीपेक्षाही कमी आहे आणि ते परदेशात जाऊन बोलू दिले जात नसल्याचे सांगतात. बाहेर देशात जाऊन खोटे बोलणार आणि येथे येऊन स्वतःला संसदेपेक्षा, सभागृहापेक्षा मोठे म्हणवणार हे चालणार नाही. एक परिवार या देशापेक्षा मोठा आहे काय, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.

हे वाचा : Rahul Gandhi माफी मागा, दोन्ही सभागृह तहकूब  

सदन नियमाप्रमाणे चालते हे कदाचित त्यांना हे माहिती नसणार. ते सभागृहात हजर राहिले असते तर त्यांना नियम समजले असते ना. त्यासाठीच तर मी त्यांच्यासाठी नियमांचे पुस्तक घेऊन आलो आहे, असा चिमटा त्यांनी काढला. राहुल गांधींची संसदेतील हजेरी कमी आहे मग तुमच्या लक्षात येईल की त्यांना काय माहिती आहे असा सवाल ठाकूर यांनी केला.

राहुल गांधींनी केंब्रिजच्या वक्तव्यावर सोडलं मौन, म्हणाले..

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधी या महिन्याच्या सुरुवातीला लंडन दौऱ्यावर होते. येथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना म्हटले की भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही. आमचे माईक बंद केले जातात. माझ्यासोबत अनेकदा असे घडले आहे. नोटबंदी हा भारतातील एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता. मात्र, आम्हाला त्यावर चर्चा करण्याचीही परवानगी दिली नाही. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरही आम्हाला चर्चा करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत आम्हाला गुदमरल्यासारखे वाटते.

Tags

follow us