Bihar Politics : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. पीएम मोदी चार हजार कोटी रुपयांच्या रेल्वे योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर बेतिया येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु, या दौऱ्याआधी बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) वेगळाच ट्विस्ट आला आहे. औरंगाबाद येथील सभेस उपस्थित नसलेले लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान (Chirag Paswan) बेतिया येथील सभेला मात्र हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र (Nitish Kumar) या सभेला हजर राहणार नाहीत. यावरच विरोधकांनी सत्ताधारी आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Bihar Politics : JDUचे सर्वेसर्वा नितीश कुमारच; लल्लन सिंह यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री नितीश कुमार या सभेला हजर राहणार नाहीत. ते आज संध्याकाळीच दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यानंतर 7 मार्च रोजी स्कॉटलंडला रवाना होणार आहेत. त्यामुळे त्यांना आज संध्याकाळच्या सभेला हजर राहता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्याऐवजी त्यांचे निकटवर्तीय मंत्री विजय चौधरी या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी नितीश कुमार यांचे कट्टर राजकीय विरोधक चिराग पासवान मात्र उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार यांची एनडीएत एन्ट्री झाल्यानंतरही चिराग पासवान त्यांच्यापासून अंतर ठेऊन आहेत. त्यामुळे बिहारच्या एनडीएत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
एनएडीएतील या घडामोडींवर विरोधी पक्ष आरजेडीकडून टीका केली जात आहे. पक्षाचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी बेगुसराय आणि औरंगाबाद येथे पीएम मोदींची बैठक झाली. त्यावेळी एनडीएतील दोन घटक पक्षांचे नेते चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा उपस्थित नव्हते. आज नितीश कुमार सुद्धा पंतप्रधानांच्या सभेला हजर राहणार नाहीत. यावरून असे दिसत आहे की एनडीए आता निगेटिव्ह डिटेक्टिव्ह अलायन्स झाले आहे.
ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन भारी पडणार! राजदच्या दाव्याने बिहारमध्ये वाढले राजकीय तापमान
एनडीएचे नेते एकमेकांची गळाभेट तर घेत आहेत पण त्यांची मनं काही जुळत नाहीत. एनडीए सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची महाआघाडी सर्व 40 जागा जिंकणार आहे. एनडीएमध्ये जागावाटपावरून घोळ सुरुच आहे. जानेवारी महिन्यातच नितीश कुमार महाआघाडीत होते तेव्हा ते जागावाटपावर बोलत होते. आता ते भाजपबरोबर गेले आहेत तरीही त्यांना जागावाटप का करता आले नाही, असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला.