Congress : काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 370 जागांवरच उमेदवार देण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी राहिलेल्या 173 जागांसाठी मित्रपक्षांना पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे. जर हे समीकरण प्रत्यक्षात उतरले तर मागील पाच लोकसभा निवडणुकांत ही पहिलीच वेळ असेल जेव्हा काँग्रेस 400 पेक्षा कमी जागांवर लढेल.
काल बंगळुरू येथे विरोधी नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत 26 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. काँग्रेस नेत्याने सांगतले की आम्ही मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी जागांवर लढण्यासही तयार आहोत. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा बाकीचे पक्षही एक किमान समान कार्यक्रम तयार करण्यास सहमती दर्शवतील. तसेच त्यांनीही काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे.
काँग्रेसच्या जानकारांच्या मते, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड सारख्या मोठ्या राज्यात 152 लोकसभा सीट आहेत. या जागांवर काँग्रेस आणि भाजपात सरळ लढत आहे. या जागांवर कोणताही दुसरा पक्ष काँग्रेसची मदत करू शकणार नाही.
विरोधी पक्ष एकत्र येण्याने भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागेल. त्यात आसाम, हरियाणा, कर्नाटक, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत या पाच राज्यांतील 133 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना विजय मिळाला होता. तर भाजपाने 89 जागा जिंकल्या होत्या.
काँग्रेसच्या रणनितीकारांनी काही जागा निश्चित केल्या आहेत जेथे काँग्रेसचे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. दिल्लीत भाजपाकडे सात जागा आहेत. या ठिकाणी आम आदमी पार्टी 4 जागांवर तर काँग्रेस तीन जागांवर लढण्यास सहमती दर्शवतील. याच पद्धतीने पंजाबमध्ये 13 पैकी 6 जागा काँग्रेससाठी सोडण्याचा विचार होऊ शकतो.
N फॉर न्यू इंडिया, D फॉर… नरेंद्र मोदींनी सांगितला एनडीएचा फूल फॉर्म
उत्तर प्रदेशात 10 ते 20 जागा मिळाव्यात अशी मागणी काँग्रेस करू शकते. राहिलेल्या जागा समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलासाठी सोडल्या जाऊ शकतात. बिहारमध्ये मागील वेळी काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार दिले होते. पण, फक्त एकच जागा जिंकता आली. यावेळी काँग्रेस आपल्या खात्यातून 2 ते 3 जागा आरजेडी आणि जेडीयू यांना देऊ शकते.
1999 मध्ये काँग्रेस 453 जागांवर लढली होती. यापैकी 114 जागांवर विजय मिळाला होता. 2004 मध्ये 417 पैकी 145 जागा मिळाल्या होत्या. 2009 मध्ये 421 पैकी फक्त 52 ठिकाणी उमेदवार विजयी झाले होते. तर त्याचवेळी भाजपाने अनुक्रमे 339, 364, 433, 428 आणि 436 जागांवर उमेदवार दिले होते.