N फॉर न्यू इंडिया, D फॉर… नरेंद्र मोदींनी सांगितला एनडीएचा फूल फॉर्म

N फॉर न्यू इंडिया, D फॉर… नरेंद्र मोदींनी सांगितला एनडीएचा फूल फॉर्म

NDA Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी नवी दिल्लीत एनडीएची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीनंतर सहभागी झालेल्या नेत्यांना मार्गदर्शन केले. एनडीएचे महत्त्व सांगताना पंतप्रधान मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात मोदींनी एनडीएचा फूल फॉर्मही सांगितला. ते म्हणाले की एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन, ए फॉर एस्पिरेशन ऑफ पीपल ऑफ इंडिया.

आज तरुण, महिला, मध्यमवर्ग, दलित आणि वंचितांचा एनडीएवर विश्वास आहे. एनडीएने मताचे नाही तर विकासाचे राजकारण केले. आम्हीही विरोधी पक्षात राहिलो, पण सरकारला विरोध करण्यासाठी विदेशांची मदत घेतली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षात राहिलो पण सरकारच्या कामात अडथळे आणले नाहीत. आज विरोधी पक्षांची अनेक सरकारे केंद्राच्या योजना राज्यांमध्ये लागू होऊ देत नाहीत. गरिबांना लाभ मिळाला तर आपले राजकारण कसे चालेल, असे या लोकांना वाटते. विविध योजनांसाठी राज्यांना पत्रे लिहावी लागतात, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

INDIA Vs NDA : ‘INDIA’ शब्दावरुन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला डिवचलं…

जनता पाहत आहे की हे पक्ष का एकत्र येत आहेत? पक्षांना जोडणारा धागा काय आहे? वैयक्तिक स्वार्थासाठी मूल्यांशी तडजोड केली जात आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे लोक पाहत आहेत. तर बंगळुरूमध्ये त्यांचे नेते एकत्र बसून हसत आहेत. बंगालमध्ये डावे, काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष कोणापासून लपलेला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Opposition Meet: बेंगळुरूमधून 26 पक्षांचा ‘सामूहिक संकल्प’, भाजपवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी म्हणाले की ते त्यांच्या राजकीय हितासाठी एकत्र येऊ शकतात, पण सोबत येऊ शकत नाहीत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांचेही कधी होऊ शकत नाहीत. त्यांच्या पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. हे लोक मोदींसाठी एवढा विचार करतात, पण त्यांनी देशासाठी इतका विचार केला असता तर? असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube