INDIA Vs NDA : ‘INDIA’ शब्दावरुन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला डिवचलं…

INDIA Vs NDA : ‘INDIA’ शब्दावरुन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला डिवचलं…

INDIA Vs NDA : इंग्रजांनी भारताला ‘इंडिया’ नाव दिले आणि काँग्रेसने ते मान्य केलंय, या शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himant Biswa sarma) यांनी काँग्रेसला डिवचलं आहे. दरम्यान, देशातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. या बैठकीला देशातील एकूण 26 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर विरोधकांच्या एकजुटीला ‘INDIA’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यावरुन आता भाजपच्या नेत्यांकडून विरोधकांना डिवचलं जात आहे.

नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण, कोणी कितीही आघाड्या केल्या तरी….; PM मोदींचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री हिमंत सरमा म्हणाले, आमची संस्कृती आमचा संघर्ष भारत आणि भारताभोवती केंद्रीत आहे. इंग्रजांनी भारताला ‘इंडिया’ नाव दिले आणि काँग्रेसने ते मान्य केले. या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडले पाहिजे, ‘इंडिया’साठी काँग्रेस आणि भारतासाठी मोदी, हे समीकरण असल्याचंही ते म्हणाले आहेत.

https://letsupp.com/mumbai/chandrakant-patil-spoke-on-mumbai-hostel-rape-case-and-made-some-important-decisions-69194.html

बैठकीनंतर राहुल गांधींनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल चढवत टीका केल्याचं दिसून आले. आता ही लढाई INDIA विरुद्ध NDA असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला ललकारलं आहे. तर आगामी निवडणुकांची रणनीती तसेच यूपीएच्या नामांतराविषयी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपला फैलावर घेतले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राहुल व सोनिया गांधींचे विमान तातडीने भोपाळला उतरविले

भाजप नेत्यांकडून ‘INDIA’ शब्दांवरुन टीका करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसकडूनही खोचक प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संविधानचा अनुच्छेद १ इंडिया म्हणजेच भारत, विविध राज्यांचा एक संघ असा आहे. भारत आणि इंडिया एकच असल्याचं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी उत्तर दिलं आहे.

आता यापुढे युपीएचे नाव INDIA म्हणजेच ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स’ असं असणार आहे. भाजपविरोधात देशातल्या विरोधी पक्षांकडून मोट बांधण्यात येत आहे. विरोधी नेत्यांची पुढची बैठक आता महाराष्ट्रात होणार असून या बैठकांमध्ये विरोधक आगामी निवडणुकीची रणनीती आखत आहेत. आगामी निवडणुकीला एक वर्षच बाकी असल्याने सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube