पीएम मोदींना धमकी देणाऱ्याला बेड्या; सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात..

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकीची चिठ्ठी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांकडे धाडण्यात आली. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोच्ची सिटी पोलीस आयुक्त के. सेतू रमन यांनी रविवारी […]

_LetsUpp (4)

PM Narendra Modi_LetsUpp

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकीची चिठ्ठी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांकडे धाडण्यात आली. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोच्ची सिटी पोलीस आयुक्त के. सेतू रमन यांनी रविवारी ही माहिती दिली.

करदात्यांनो, तुम्ही ITRभरला का? 31 जुलैपूर्वी आयटीआर भरण्याचे ‘हे’ आहेत फायदे

पोलीस आयुक्तांनी सांगितले की मोदी यांच्या कोची दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास दोन हजार पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. वाहतुकीचेही नियमन केले जात आहे. प्रधानमंत्री मोदींच्या रोड शो मध्ये पंधरा हजार तर युवम – 23 कार्यक्रमात वीस हजार लोक येतील असा अंदाज आहे. युवम – 23 मधील सहभागी फक्त मोबाइल फोन घेऊन येऊ शकतात.

पीएम मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. येथे विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे मोदींच्या दौऱ्याची माहिती लीक होण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय विदेश राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी सांगितले, प्रधानमंत्रींच्या केरळ दौऱ्याचा गोपनीय अहवाल लीक होणे गंभीर सुरक्षा चूक आहे.

अतिकने ताब्यात घेतलेली संपत्ती पीडितांना परत मिळणार; योगी सरकारचा मोठा निर्णय

Exit mobile version