करदात्यांनो, तुम्ही ITRभरला का? 31 जुलैपूर्वी आयटीआर भरण्याचे ‘हे’ आहेत फायदे

करदात्यांनो, तुम्ही ITRभरला का? 31 जुलैपूर्वी आयटीआर भरण्याचे ‘हे’ आहेत फायदे

These are the benefits of filing ITR before 31st July : केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळं करदात्यांना 31 जुलैपूर्वी आयटीआर भरणं गरजेचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न (Annual income) हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ITR भरणं बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी करतादात्यांनी विहित मुदतीन आयटीआर भरणं आवश्यक आहे. खरंतर अनेकांना वाटतं की, आयटीआर फायलिंग ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ज्याद्वारे प्राप्तिकर विभाग तुचम्या करपात्र उत्पन्नाचा तपशील ठेवतो. मात्र, याचे काम हे फक्त उत्पन्न अन् खर्चाची माहिती देणे नाही, तर याशिवाय, ITR चे अनेक फायदे आहेत. ज्याची अनेकांना माहिती नाही. विहित तारखेपर्यंत (31 जुलै) पर्यंत आयटीआर भरण्याचे नेमके काय फायदे आहेत, याच विषयी जाणून घेऊ.

कर्ज मिळेल
बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी आयकर रिटर्न हा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. कर्जासाठी बॅंक तुमच्याकडे 2 ते 3 वर्षाचे आयकर रिटर्न मागते. आयटीआर भरला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल. याशिवाय, व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीआर महत्वाचे आहे.

क्रेडिट स्कोअर मजबूत करते
आयकर रिटर्न वेळेवर भरल्याने सिबिल स्कोअर सुधारतो. कोणत्याही बॅंकेत कर्ज अर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणं आवश्यक आहे.

विमा संरक्षण
तुम्हाला 1 कोटी रुपयांचा विमा घ्यायचा असेल तर विमान कंपनी तुमच्याकडे आयटीआर मागू शकते. तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत माहिती करून घेण्यासाठी आणि नियमित उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी आयटीआरवरच विश्वास ठेवतात

Ambegaon Election : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकम राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात

याशिवाय, कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी करदात्यांनी विहित मुदतीत ITR दाखल करणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, उशीरा आयटीआर भरल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

जर तुम्ही 31 जुलै या तारखेपर्यंत ITR भरला नसेल तर नियमांनुसार तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, तुम्हाला आयटीआर फाइलिंगमध्ये उशीर झाल्यास करावर व्याज देखील भरावे लागेल.

आयकर कायदा 1961 च्या कलम 70 आणि 71 मध्ये विशिष्ट वर्षाचे नुकसान पुढील वर्षात पुढे नेण्यासाठी काही तरतुदी आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे नुकसान पुढील मूल्यांकन वर्षात पुढे नेऊ शकता.

तुम्ही ITR दाखल करता तेव्हा सरकार तुम्हाला काही कपातीची परवानगी देते. त्यामुळे करदात्यांवरचा बोजा कमी होण्यास मदत होते. यामुळे अधिकाधिक लोकांना ITR दाखल करण्यास प्रवृत्त केले जाते.

आयटीआरमुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याचा क्षमतेचा अंदाज येतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube