Iga Swiatek विम्बल्डन 2025 चॅम्पियन, अंतिम सामन्यात अमांडा अनिसिमोवालावर मात

Iga Swiatek : पोलंडची स्टार टेनिसपटू इगा स्विएटेक विम्बल्डन 2025 ची (Wimbledon 2025) चॅम्पियन बनली आहे. स्विएटेकने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यता अमेरिकेच्या अमांडा अनिसिनोवाला (Amanda Anisimova) 6-0, 6-0 असा पराभव करत बाजी मारली आहे. स्विएटेकने (Iga Swiatek) पहिल्यांदाच स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. 24 वर्षीय स्विएटेक यापूर्वी विम्बल्डनमध्ये क्वार्टर फायनलच्या पुढे जाऊ शकली नव्हती मात्र यंदा तिने शानदार कामगिरी करत बाजी मारली आहे. इगा स्विएटेकने उपांत्य फेरीत बेलिंडा बेन्सिकला 6-2, 6-0 असे पराभूत केला होता.
Grass, mastered. 🏆
Iga Swiatek is Poland’s first Wimbledon singles champion 🇵🇱 pic.twitter.com/5fsPpX4ANC
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2025
अंतिम सामन्यात इगा स्विएटेकने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती आणि फक्त 57 मिनिटांत या सामन्यात विजय मिळवला. 1911 नंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला खेळाडूने विम्बल्डनमध्ये एकही गेम न गमावता अंतिम फेरी जिंकली आहे. अंतिम फेरीत एकही गेम न गमावता प्रमुख विजेतेपद जिंकणारी स्विएटेक ही ओपन एरामधील दुसरी खेळाडू आहे. तिच्या आधी 1988 च्या फ्रेंच ओपनमध्ये स्टेफी ग्राफने नतालिया झ्वेरेवाचा पराभव केला होता. स्टेफी ग्राफ 32 मिनिटांत विजेती ठरली होती.
मोठी बातमी, बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक