नोव्हाक जोकोविचचं पुन्हा एकदा स्वप्न भंगल! कार्लोस अल्काराझने पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद
Wimbledon final 2024 : पुरुषांच्या विम्बल्डन अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझने तुफानी कामगिरी करून इतिहास रचला आहे. कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Wimbledon) याचा सरळ सेटमध्ये ६-२,६-२,७-६ असा पराभव करून इतिहास रचला आहे. (Novak Djokovic) या विजयासह कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलं आहे.
२४ वेळा ग्रँडस्लॅम विजेते पद
कार्लोस अल्काराझने पहिला आणि दुसरा सेट ६-२, ६-२ असा जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये नोवाकने चांगली सुरुवात केली आहे. हा सेट ६-६ असा बरोबरीत होता. त्यानंतर टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला. २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता झालेला नोव्हाक जोकोविच गेल्या वर्षी कार्लोस अल्काराझकडून पराभूत झाला होता.
India Team: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए ची घोषणा या युवा खेळाडूंकडं दिलं नेतृत्व
फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन सलग जिंकणारा कार्लोस अल्काराझ आता सहावा खेळाडू ठरला आहे. एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा आणि गवत, माती आणि हार्ड कोर्टवर विजेतेपद पटकावणारा कार्लोस अल्काराझ आता वयाच्या २२ वर्षापूर्वी दोन विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा बोरीस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
नोव्हाक जोकोविचचं स्वप्न पुन्हा भंगलं
३७ वर्षीय नोव्हाक जोकोविचने अंतिम सामना जिंकला असता तर त्याने इतिहासात स्वत:चं नाव कोरलं असतं. या विजयासह नोव्हाक जोकोविचला टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे (पुरुष आणि महिला) जिंकणारा खेळाडू बनण्याची संधी होती. परंतु, कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचे स्वप्न भंग केलं.