Wimbledon 2023 : विश्वविजेत्या जोकोविचचा पराभव करत, अल्काराज बनला विम्बल्डनचा नवा बादशहा

  • Written By: Published:
Wimbledon 2023 : विश्वविजेत्या जोकोविचचा पराभव करत, अल्काराज बनला विम्बल्डनचा नवा बादशहा

Wimbledon 2023 Winner: विम्बल्डनला यंदा नवा बादशहा मिळाला आहे. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत विम्बल्डन 2023 चे विजेतेपद पटकावले. पाच सेटच्या लढतीत अल्काराझने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचचा 6-1, 6-7(6), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. यासह अल्काराझने फ्रेंच ओपनमधील जोकोविचच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी जोकोविचने अल्काराझचा पराभव करून फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. (Defeating world champion Djokovic, Alcaraz became the new King of Wimbledon)

वर्ल्ड नंबर वन आणि वर्ल्ड नंबर टू यांच्यात विम्बल्डन फायनलमध्ये चुरशीची स्पर्धा होती. जोकोविचने पहिल्या सेटची शानदार सुरुवात केली आणि त्याने अल्काराझवर 6-1 अशी मात केली. दुसऱ्या सेटमध्ये अल्काराजनने जोरदार पुनरागमन केले. अल्काराझने दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचचा 7-1 असा पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच खूपच थकलेला दिसत होता आणि अल्काराझने याचा फायदा घेतला. अल्काराझने तिसरा सेट 6-1 असा जिंकण्यात यश मिळविले.

मात्र चौथ्या सेटमध्ये जोकोविचने चॅम्पियनसारखे पुनरागमन केले. जोकोविचने चौथा सेट 6-3 ने जिंकला. मात्र, पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये अल्काराझने पुन्हा जोकोविचवर मात करत 6-4 असा विजय मिळवला. अशा प्रकारे अल्काराझने जोकोविचला हरवण्यात यश मिळवले.

बांगलादेशसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, 40 धावांनी पराभव

अल्काराझने इतिहास रचला

अल्काराझने वयाच्या 20 व्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. गतवर्षी अल्काराझ यूएस ओपन जिंकण्यात यशस्वी ठरला होता. वयाच्या 20 व्या वर्षी अल्काराझ हा दोन प्रमुख विजेतेपदे जिंकणारा पाचवा टेनिसपटू ठरला आहे.

यासह अल्काराझ हा टेनिस जगताचा बादशहा जोकोविचला मागे टाकणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. जोकोविचने हे विजेतेपद पटकावले असते तर त्याचे हे 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले असते. पण तो चुकला. अल्काराझच्या टक्कर दरम्यान पिछाडीवर असताना जोकोविच इतका संतापला की त्याने त्याचे रॅकेट देखील फोडले. मात्र, जोकोविचला हरवून अल्काराझने फेडरर, नदाल आणि जोकोविचनंतर टेनिस जगताला नवा स्टार मिळाल्याचे दाखवून दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube