Video : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही धोनीची मोहिनी, स्वतः आमंत्रण देत लुटला गोल्फचा आनंद

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 08T120929.945

MS Dhoni With Donal Trumph : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) क्रेज केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात आहे. यात अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांचाही समावेश आहे. याचाच प्रत्यय बलाढ्य अशा अमेरिकेत आला असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trumph) यांनी धोनीला स्वतः आमंत्रित करत त्याच्यासोबत गोल्फ खेळल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोनंतर धोनीची मोहिनी ट्रम्प यांनादेखील असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Aus vs SA : क्रिकेटचा थरार! ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळ; हरणारा सामना जिंकला

धोनी सध्या अमेरिकेत असून, त्याने तेथे नुकताच यूएस ओपनमधील कार्लोस अल्काराझचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर धोनी अमेरिकेत असल्याचे ट्रम्प यांना कळाले. त्यानंतर त्यांनी स्वतः बेडमिन्स्टर येथील ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब येथे धोनील गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hitesh Sanghvi (@hitesh412740)

गोल्फ, टेनिस अन् फुटबॉलचा प्रेमी आहे धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने क्रिकेटमध्ये मोठे यश संपादन केले आहे. मात्र, धोनीला क्रिकेटशिवाय गोल्फ, टेनिस आणि फुटबॉल खेळायला आवडते. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरून समोर आले आहेत.

भारत विश्वविजेता? युवराज सिंगच्या प्रश्नावर सेहवागचं खास प्रत्युत्तर, म्हणाला..,

जवळच्या मित्राने शेअर केला फोटो

दरम्यान, ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेत गोल्फ खेळण्याचा आनंद लुटतानाचा फोटो धोनीच्या जवळच्या मित्र आणि व्यावसायिक हितेश सांघवी यांनी इन्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्यांनी ट्रम्प यांनी आमंत्रिक केल्याबद्दल आभार मानले आहेत. सांघवी यांनी फोटो शेअर करण्याबरोबरच एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात ट्रम्प आणि धोनी एकत्र गोल्फ खेळताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chakri Dhoni (@dhonifan.chakri)

Tags

follow us