Aus vs SA : क्रिकेटचा थरार! ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळ; हरणारा सामना जिंकला
Aus vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळाला. कठीण काळातही संयम आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात कशी करायची याचं उदाहरण कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दाखवून दिले. संघाची बिकट स्थिती झाली होती. 113 धावांवर 7 गडी बाद झाले होते. आता काय सामना जिंकणार, अशाच प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या तोंडी असताना लाबुशेन आणि एश्टन एगर या दोघांनी जिगरबाज खेळ दाखवत अशक्यप्राय वाटणारा मिळणारा विजय दक्षिण आफ्रिकेच्या हातून हिसकावून आणला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने 222 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 40 ओव्हरमध्येच विजय साकारला.
भारत विश्वविजेता? युवराज सिंगच्या प्रश्नावर सेहवागचं खास प्रत्युत्तर, म्हणाला..,
या सामन्यात मार्शल लाबुशेन याने 80 धावा केल्या. आठव्या विकेटसाठी त्याने एश्टन एगर बरोबर 112 धावांची विजयी भागीदारी रचली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.