India Team: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘ए’ची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूंकडं दिलं नेतृत्व

India Team: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘ए’ची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूंकडं दिलं नेतृत्व

IND-A vs AUS-A :  भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए-वूमन्स टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. (IND vs AUS) मीनू मणी टीम इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे. तर, श्वेत सहरावत ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकूण 7 सामने खेळणार आहे. (India Team) टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 मालिका खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार 3 टी20, 3 वनडे आणि 1 सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. या मल्टीसीरिज असलेल्या दौऱ्याची सुरुवात 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 22 ऑगस्टला या दौऱ्याची सांगता होणार आहे.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना संधी IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात

इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील टी 20 मालिकेतील सामने हे एलन बॉर्डर फिल्डमध्ये खेळण्यात येणार आहेत. तर 50 षटकांचे सामने हे मॅके येथे होतील. तर 4 दिवसांचा सामना हा गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मीनू मणी हीने टीम इंडियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 टी 20 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. तसंच मीमूने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच मीनू डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलंय. बीसीसीआय महिला निवड समितीने डब्ल्यूपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये किरण नवगिरे, प्रिया पूनिया, शुभा सतिश, सजना संजीन साईका इशाक आणि मेघना सिंह यांचा समावेश आहे.

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात बदल; बीसीसीआयने जाहीर केले नवे वेळापत्रक

अस असणार टी 20 मालिकेच वेळापत्रक 

  • पहिला सामना, बुधवार, 7 ऑगस्ट
  • दुसरा सामना, शुक्रवार, 9 ऑगस्ट
  • तिसरा सामना, रविवार, 11 ऑगस्ट
  • वनडे सीरिज
  • पहिला सामना, बुधवार, 14 ऑगस्ट
  • दुसरा सामना, शुक्रवार, 16 ऑगस्ट
  • तिसरा सामना, रविवार, 18 ऑगस्ट
  • 4 दिवसीय एकमेव सामना, 22 ते 25 ऑगस्ट

वूमन्स टीम इंडिया ए – मिन्नू मणी (कॅप्टन), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा चेत्री (विकेटकीपर), शिप्रा गिरी (विकेटकीपर), राघवी बिश्त, सायका इशाक, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील (फिटनेस टेस्ट) आणि एस यशश्री.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube