पहिला चित्रपट अन् पहिला फिल्मफेअर, अभिनेता धैर्य घोलपला बेस्ट डेब्यू पुरस्कार

पहिला चित्रपट अन् पहिला फिल्मफेअर, अभिनेता धैर्य घोलपला बेस्ट डेब्यू पुरस्कार

Dhairya Gholap : मराठी सिनेविश्वात अनेक नवनवीन कलाकार येत असतात आणि सगळेच त्यांचा अभिनयाची छाप सोडून जातात असाच एक अभिनेता म्हणजे धैर्य घोलप (Dhairya Gholap) . ” एक नंबर ” (Ek Number) या चित्रपटातून त्याने चित्रपट विश्वात पदार्पण केलं आणि फिल्मफेअर मराठी 2025 (Filmfare Marathi 2025) मध्ये त्याने बेस्ट डेब्यू पुरस्कार पटकावला. अभिनयाची जिद्द आवड आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला त्याचा एक नंबर परफॉर्मन्स सगळचं काही तो जिंकून गेला अस म्हणायला हरकत नाही.

पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी धैर्यला हा खास पुरस्कार मिळाला असून त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. धैर्य म्हणतो ” मी अत्यंत कृतज्ञ आणि जवाबदारीच्या भावनेतून हा पुरस्कार स्वीकारला आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम माझ्यासोबत होती आणि म्हणून मी प्रताप सारखी भूमिका साकारू शकलो. एक नंबर टीम आणि एक नंबर सिनेमा बनवणाऱ्या माझ्या सगळ्या एक नंबर माणसांना धन्यवाद.

Iga Swiatek विम्बल्डन 2025 चॅम्पियन, अंतिम सामन्यात अमांडा अनिसिमोवावर मात

एवढं नाही तर या पुरस्काराच श्रेय चक्क माननीय राज साहेब ठाकरे यांना सुद्धा दिलं आहे. एक नंबर भूमिका साकारणारा धैर्य हा येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका मधून दिसणार असल्याचं देखील कळतंय.

‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ या चित्रपटात दिसणार सुपरस्टार जॅकी श्रॉफ; प्रेक्षकांना मिळणार कॉमेडी डोस

follow us
  • fb
  • instagram
  • youtube