Pravin Tarde: मित्रासाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाला, “चौकातल्या पोराला फिल्मफेअर…”

Pravin Tarde: मित्रासाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाला, “चौकातल्या पोराला फिल्मफेअर…”

Pravin Tarde Post: मराठी कलाविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. (Filmfare Award 2024) यंदा ‘वाळवी’, ‘उनाड’, ‘झिम्मा 2’, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘बापल्योक’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मराठी कलाकारांचा जलवा रेड कार्पेटवर पाहायला मिळाला.


यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात अनेक मराठी सिनेमांना पुरस्कार मिळाले. तर आता देवेंद्र गायकवाडला (Devendra Gaikwad) फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) मिळाल्यानंतर प्रविण तरडेंनी (Pravin Tarde) मित्रासाठी खास पोस्ट शेअर केली.

देवेंद्र गायकवाडचा फिल्मफेअरच्या ट्रॉफीसोबतचा फोटो पोस्ट करत प्रविण तरडे भावुक पोस्ट शेअर केली. “चौकातल्या पोराला फिल्मफेअर… आज दयाचे वडील हवे होते. लहान मुला सारखे नाचले असते. पुरुषोत्तम करंडकच्या बक्षिस समारंभापासून प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक करायला यायचे. मला गमतीने म्हणायचे, ये तरडे अरे हा नुसतं तुझ्याबरोबर फिरणार का तुझ्यासारखी बक्षिसं पण घेणार? बघितलं का काका जे अजून मलाही नाही मिळालं ते बक्षिस आज तुमच्या मुलानी घेऊन दाखवलं…दया तुझा अभिमान आहे आम्हाला”, असं प्रविण तरडेंनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

Kiran Rao: आमिर खानसोबतच्या घटस्फोटाविषयी अभिनेत्री थेटच म्हणाली, ‘आम्हाला आमच्या नात्याची… ‘

देवेंद्र गायकवाड यांनी ‘चौक’ सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. हा सिनेमा 2 जून 2023ला रिलीजज झाला होता. या मराठी सिनेमात संस्कृती बालगुडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, प्रविण तरडे, स्नेहल तरडे, असे तगडे कलाकार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube