Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा ‘नवा सिनेमा नवा अवतार…’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा ‘नवा सिनेमा नवा अवतार…’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा नवा सिनेमा नवा अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


याआधी दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची रंजक अशी गोष्ट आता ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी सिनेमातून मांडण्यात आली आहे. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज झालं आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ या सिनेमाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं आहे. येत्या 8 मार्चला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे यांचा अभिनय आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत. मास्क, सँनिटायझर अन् बरचं काही

‘लॉकडाऊन लग्न’ सिनेमाच्या पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून सिनेमातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या सिनेमांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. ‘लॉकडाऊन लग्न’ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची खूपच उत्सुकता लागली आहे.

Sunny Leone: सनी लिओनी थिरकली ‘फना’ गाण्यावर, चाहत्यांना केले घायाळ

प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर 2’ हा सिनेमा देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याआगोदर बलोच, सरसेनापती बंबीरराव अशा सुपरहिट सिनेमांत प्रवीण तरडेंच्या अभिनयाची जादू बघायला मिळाली आहे. आता प्रवीण तरडेंच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल 18 हुन जास्त सिनेमाची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube