Download App

राष्ट्रवादी-तृणमूलचा राष्ट्रीय दर्जा का काढला ? ; वाचा, कोणत्या अटी कराव्या लागतात पूर्ण ?

Election Commission : निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना जोरदार झटका देत त्यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला. आयोगाने जारी केलेल्या आदेशात आरएलडी, आंध्र प्रदेशात बीआरएस, मणिपुरात पीडीए, पुदुच्चेरीत पीएमके, पश्चिम बंगालमध्ये आरएसपी आणि मणिपूर राज्यात एमएसपी या पक्षांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे.

आयोगाने म्हटले, आम आदमी पार्टीला दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरातमध्ये त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर राष्ट्रीय पार्टीचा दर्जा दिला गेला आहे. आप सध्या दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात  सत्तेत आहे.

राष्ट्रीय राजनितीक पक्षांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस, भाकपा आणि तृणमूल काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. भाजपा, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष (बसपा), नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि आप आता राष्ट्रीय पक्ष आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने म्हटले, की टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कामगिरीनुसार नागालँड आणि मेघालयात राज्य पक्षाचा दर्जा देण्यात येईल.

केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, आयोगाचा अनेक दिग्गजांना धक्का

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या तीन अटींची पूर्तता करावी लागते, त्या अटी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ या..

पहिली अट म्हणजे पार्टीच्या उमेदवारांना कमीत कमी चार राज्यात मागील निवडणुकीत प्रत्येक राज्यात झालेल्या एकूण मतदानाच्या 6 टक्के मते मिळवावी लागतात. या व्यतिरिक्त लोकसभेची कमीत कमी चार जागांवर विजय मिळवावा लागतो.

राष्ट्रीय पातळीवरील पक्षाचा लोकसभेतील एकूण जागांपैकी कमीत कमी 2 टक्के जागा जिंकणे बंधनकारक आहे.

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, पार्टीला कमीत कमी चार राज्यात राज्य पातळीवरील पक्षाच्या रुपात मान्यता मिळालेली असली पाहिजे.

देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. यामध्ये तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भाजपा, भाकपा, भाकपा (मार्क्सवादी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीआयला हटवून आम आदमी पार्टीला या यादीत समाविष्ट केले गेले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेले पाच राजकीय पक्ष राहिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी म्हटले की इतक्या कमी वेळात राष्ट्रीय पार्टी ?,  हे कोण्या चमत्कारापेक्षा कमी नाही. सगळ्यांचे अभिनंदन. देशातील कोट्यावधी लोकांनी आम्हाला इथपर्यंत  पोहोचवले. लोकांना आमच्याकडून काही अपेक्षा आहेत. आज लोकांनी आमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे.

Tags

follow us