‘भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?’ इलेक्टोरल बाँडवरुन शाहांचा विरोधकांना सवाल

Amit Shah on Electoral Bond : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा (Electoral Bond) चांगलाच गाजत आहे. या बाँडच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपालाच सर्वाधिक पैसा मिळाल्याचा दावा करत विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला सहा हजार कोटी रुपये मिळाल्याचं […]

'भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?' अमित शाहांचा विरोधकांना सवाल

'भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?' अमित शाहांचा विरोधकांना सवाल

Amit Shah on Electoral Bond : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा (Electoral Bond) चांगलाच गाजत आहे. या बाँडच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपालाच सर्वाधिक पैसा मिळाल्याचा दावा करत विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला सहा हजार कोटी रुपये मिळाल्याचं सांगता मग राहिलेले 14 हजार कोटींचे निवडणूक रोखे कुठे गेले? असा सवाल त्यांनी विरोधी पक्षांना विचारला.

भारतीय राजकारणातून काळा पैसा समाप्त करण्याच्या उद्देशाने निवडणूक रोख्यांची योजना सुरू केली होती. सर्वोच्च न्यायालय जो (Supreme Court) निर्णय देतं तो सगळ्यांना मानावाच लागतो. यावर मी भाष्य करू इच्छित नाही पण, मी कोणत्याही व्यासपीठावर कोणत्याही व्यक्तीबरोबर चर्चा करण्यास तयार आहे. इलेक्टोरल बाँडच्या आधी राजकीय पक्षांना रोख स्वरुपात देणग्या दिल्या जात होत्या.

Amit Shah : “POK भारताचा, तिथले लोकही आपलेच”; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

बाँडच्या माध्यमातून कसे पैसे येतात तर चेकद्वारे आरबीआयकडे देऊन बाँड खरेदी केले जातात. यामध्ये गोपनियतेचा प्रश्न येतो. पण, याआधी जे पैसे रोख स्वरुपात घेतले जात होते. त्यात कुणाचं नाव समोर आलं हे जरा सांगाल का, असा प्रश्न अमित शाहांनी विचारला. आता असं सांगितलं जात आहे की निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला मोठा फायदा झाला. राहुल गांधींनी तर सांगितलं की निवडणूक रोखे हा वसुलीचा सर्वात मोठा मार्ग आहे. कोण ह्यांना हे सगळं लिहून देतं माहिती नाही.

भारतीय जनता पार्टीला सहा हजार कोटींचे बाँड मिळाले. एकूण सगळे बाँड वीस हजार कोटींचे आहेत. मग 14 हजार कोटींचे बाँड कुठे गेले. तर टीएमसीला 1600 कोटींचे बाँड मिळाले. काँग्रेसला 1400 कोटी, भारत राष्ट्र समिती 1200 कोटी, बीजेडीला 775 कोटी आणि डीएमकेला 639 कोटी रुपयांचे बाँड मिळाले असे स्पष्ट करत ज्यावेळी हिशोब होईल तेव्हा या लोकांना (विरोधक) तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असे अमित शाह म्हणाले. या योजनेआधी जेव्हा रोख स्वरुपात दिल्या जात होत्या. तेव्हा काँग्रेस पक्ष 100 रुपये पक्षाकडे आणि 1 हजार रुपये स्वतःकडे ठेवत होता, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.

‘शिवसेना अन् राष्ट्रवादी आम्ही फोडले नाही तर.. अमित शाहांनी शेवटी खरं ‘पॉलिटिक्स’ सांगितलंच

 

Exit mobile version