पद्मश्री विजेत्याने धरले मोदींचे हात; म्हणाले, मोदीजी तुम्ही मला…

Padma Awards : कर्नाटक येथील शाह रशीद अहमद कादरी यांना आज पद्म पुरस्काराने (Padma Awards) गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कादरी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तींचे भेट घेत अभिनंदन […]

Modi And Kadari

Modi And Kadari

Padma Awards : कर्नाटक येथील शाह रशीद अहमद कादरी यांना आज पद्म पुरस्काराने (Padma Awards) गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कादरी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तींचे भेट घेत अभिनंदन केले. मोदी पुरस्कार्थींची एक एक करून भेट घेत शाह रशीद अहमद कादरी (Shah Ahmed Kadari) यांच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना अभिवादन केल्यानंतर दोघांत जो संवाद झाला तो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत कादरी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणत आहेत, की ‘मला काँग्रेसचं सरकार असताना पद्म पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती पण, तसं झालं नाही. भाजपचं सरकार आल्यानंतर तर मी अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, तुम्ही मला चुकीचं ठरवलंत’, असे कादरी म्हणाले. त्यावेळी मोदी यांनी हसत हसत कादरी यांच्या हातावर टाळी दिली आणि त्यांचे अभिनंदन करून ते पुढे निघून गेले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जवळपास 106 जणांना प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काल बुधवारी यातील 53 जणांना राजभवनात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याआधी 22 मार्च रोजीही काही जणांना पुरस्कार देण्यात आले होते. बुधवारी देण्यात आलेल्या पुरस्कारात तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 45 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

कादरी यांचाही यामध्ये समावेश होता. कादरी यांनी 500 वर्षे जुनी असलेली बिदरी कला जिवंत ठेवली आहे. बिदरी ही एक लोककला असून शाह कादरी हे अनेक वर्षांपासून बीदरी कलेची भांडी तयार करत आहेत. त्यांना कर्नाटकचे शिल्पगुरू म्हणूनही ओळखले जाते.

Exit mobile version