Bus Caught Fire : राजस्थानातील जयपूर ते दिल्लीला नियमित प्रवास करणाऱ्या खासगी बसने अचानक पेट (Bus Caught Fire) घेतल्याची भीषण घटना घडली आहे. या बसमध्ये 48 प्रवासी होती. काही कळण्याच्या आत बसने पेट घेतला. त्यामुळे या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. जयपूरहून दिल्लीला जात गुरुग्रामच्या सिग्नेचर फ्लायओव्हर येथे ही घटना घडली. अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी या पेटत्या बसमधून उड्या मारल्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. येथील वाहतूक कोंडीही सुरळीत केली.
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरहून दिल्लीला जाणारी बस बुधवारी मध्यरात्री गुरुग्रामच्या सिग्नेचर टॉवर फ्लायओव्हरवर पोहोचली तेव्हा या बसने पेट घेतला. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन करत घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिश्रम करत आगीवर नियंत्रण मिळवले.
#WATCH | Haryana: Latest visuals from the Delhi-Jaipur expressway in Gurugram where two people died after a bus was gutted in the fire. https://t.co/MlZZFKJwTj pic.twitter.com/guNWS72CKz
— ANI (@ANI) November 8, 2023
गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त वरुण दहिया म्हणााले, ही घटना बुधवारी रात्री घडली. होरपळून मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आगीमुळे भाजलेल्या प्रवाशांनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात असून कशामुळे आग लागली याचा शोध घेतला जात आहे.