Download App

रामदेव बाबांना ‘सुप्रीम’ झटका! आता योग शिबीरांसाठीही भरावा लागणार सेवाकर

Ramdev Baba : भ्रामक जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागण्याची नामु्ष्की ओढवलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी (Ramdev Baba) सुप्रीम कोर्टाने आणखी एक दणका दिला आहे. बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांतून होणारी कमाई रडारवर आली आहे. ही शिबीरे सेवा कराच्या कक्षेत आली आहेत. योग शिबीरांचे आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायनमूर्तींनी यासंदर्भात सेवाकर अपिलीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

या संदर्भात ट्रस्टचे अपील फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, शुल्क आकारल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये योगा करणे म्हणजे ही एक सेवा आहे. या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आम्हाला मिळाले नाही. सीईएसटीएटीने आपल्या आदेशात म्हटले आहे की पतंजली योगपीठ ट्रस्टने आयोजित केलेल्या निवासी आणि अनिवासी योग शिबीरांमध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे ते आरोग्य आणि फिटनेस सेवा या प्रकारात येते. त्यामुळे यावर सेवाकर लागू होईल. योगगुरू रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेला हा ट्रस्ट विविध शिबिरांत योग प्रशिक्षण देण्याचे काम करतो.

याआधी ट्रिब्युनलने आपल्या आदेशात म्हटले होते की योग शिबिरांच शुल्क या शिबीरात सहभागी होणाऱ्या व्यक्तींकडून देणगी म्हणून वसूल केले जात होते. ही रक्कम देणगी म्हणून जमा करण्यात आली असली तरी ती केवळ सेवा देण्यासाठी शु्ल्क म्हणून होती. त्यामुळे ते शु्ल्काच्या व्याख्येत येते.

सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयु्क्त यांनी ऑक्टोबर 2006 ते मार्च 2011 या कालावधीसाठी दंड आणि व्याजासह साडेचार कोटी रुपयांच्या सेवाकराची मागणी केली होती. याला उत्तर देताना ट्रस्टने युक्तिवाद केला की ते आजारांवर उपचार करण्यासाठी सेवा देत आहेत. आरोग्य आणि फिटनेस सेवा अंतर्गत या सेवा करपात्र नाहीत, असे सांगण्यात आले.

2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा?

follow us

वेब स्टोरीज