Download App

PM मोदींच्या अमेरिकेतील खास पाहुण्यांची राहुल गांधींना भेटण्याची इच्छा; खाजगी बैठकीच्या मागणीवर बसले अडून

Rahul Gandhi : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अमेरिकेतील खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण चक्रवर्ती यांनी सांगितले की भारतीय वंशाचे अमेरिकी खासदारांचे प्रतिनिधीमंडळाने त्यांच्या भारत दौऱ्यात राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या सदस्यांनी आमच्याशी संपर्क देखील केला होता. त्यानंतर आम्हीही सकारात्मक उत्तर दिले.

राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर आहेत. त्यानंतर या भेटीचे नियोजन करता येईल असे अमेरिकी खासदारांना कळवल्याचे चक्रवर्ती म्हणाले. यानंतर आता विदेश मंत्रालय या भेटीसाठी परवानगी देईल का,असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विदेश मंत्रालय आणि अमेरिकी डेलीगेशन यांच्यातील हा मुद्दा आहे. पण, तरीही मला असे वाटते की विदेश मंत्रालयालाही यात काही अडचण नसेल.

केंद्र सरकारने ‘नेहरू मेमोरियल म्युझियम’चे नाव बदलले, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांची भेट घ्यावी असे या खासदारांना वाटते का असे विचारले असता त्यावर अमेरिकी खासदार रो खन्ना म्हणाले, काही खासदारांनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, भारताच्या विदेश मंत्रालयालाच यावर निर्णय द्यावा लागणार आहे.

खन्ना यांनी इंडिया टुडेला सांगितले होते की अमेरिकी खासदारांचे हे प्रतिनिधीमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाहुणे आहेत. याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांची आहे. लोकांनाही या प्रतिनिधीमंडळाला भेटण्याची इच्छा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही विदेश मंत्रालयाला माहिती दिल्याचे खन्ना म्हणाले. या घडामोडींनंतर अद्याप केंद्र सरकार किंवा विदेश मंत्रालयाकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. विदेश मंत्रालय अमेरिकी खासदारांना राहुल गांधींची भेट घेण्याची किंवा त्यांच्याबरोबर बैठक घेण्याची परवानगी देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

Tags

follow us