केंद्र सरकारने ‘नेहरू मेमोरियल म्युझियम’चे नाव बदलले, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

केंद्र सरकारने ‘नेहरू मेमोरियल म्युझियम’चे नाव बदलले, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

Nehru Memorial Museum ; स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने नेहरु मेमोरियल म्युझियमच्या (Nehru Memorial Museum) नावात बदल केला आहे. नेहरू म्युझियमला यापुढे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (Prime Minister Museum and Library Society) म्हटले जाईल. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा हे पीएम म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. नृपेंद्र मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव होते.

माजी पंतप्रधान नेहरू यांचे शासकीय निवासस्थान
1929-30 दरम्यान बांधलेले तीन मूर्ती हाऊस पूर्वी भारतातील कमांडर इन चीफचे अधिकृत निवासस्थान होते. स्वातंत्र्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान बनले. नेहरू 1964 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत सुमारे 16 वर्षे येथे राहिले. त्यानंतरच्या सरकारने नेहरूंना समर्पित या इमारतीत संग्रहालय आणि ग्रंथालय बांधण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियमचे उद्घाटन करून एनएमएमएल सोसायटीची स्थापना करण्यात आली होती.

शरद पवार भाजपसोबत येणार का? गुप्त बैठकीतील चर्चेनंतर अमित शाहंचा थेट अजितदादांना फोन

पंतप्रधानांनी कल्पना मांडली होती
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय तीन मूर्ती संकुलात उभारण्याची कल्पना मांडली होती. NMML च्या कार्यकारी परिषदेने 25 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या बैठकीत याला मान्यता दिली होती. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधानांचे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले आहे.

Vinesh Phogat ; एशियन गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का, विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
नेहरू स्मारक संग्रहालयाच्या नामांतरावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, ज्यांना इतिहास नाही ते इतरांचा इतिहास पुसायला निघाले आहेत. नाव बदलण्याने पंतप्रधान नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची उंची कमी करता येणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube