Download App

Video : सीतारामन पहिल्या हसल्या मग डोक्याला हात लावला; लोकसभेत नेमकं काय घडलं?

भाषणावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : नुकत्याच सादर करणाऱ्या अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) सत्ताधारी मोदी सरकावर सडकून टीका केली. तसेच देश सहाजणांच्या चक्रव्यूहात अडकल्याचा गंभीर आरोपही राबहुलं गांधींनी केला. एकीकडे राहुल गांधी जीव तोडून भाषण देत असतानाच अचानाक अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांना हसू आवरलं नाही आणि त्यांनी हसता हसताच थेट डोक्याला हात लावला. सध्या राहुल गांधींच्या जोरदार भाषणाची तर, दुसरीकडे सीतारामन यांच्या डोक्याला हात लावण्याच्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं असं काय घडलं की, सीतारामन यांनी थेट डोक्यालाच हात लावला. (Rahul Gandhi Speech In Loksabha)

फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत; फडणवीस-देशमुख वादात पटोलेंची उडी

अर्थसंकल्पापूर्वीचा फोटो दाखवताच सीतारामन हसल्य अन्…

भाषणावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशीच्या हलवा कार्यक्रमाचा फोटो दाखवत अर्थसंकल्पात देशातील सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचे सांगितले. या देशात 73 टक्के मागास वर्ग आहे. त्यामध्ये दलित, आदिवासी, फिछडा वर्ग आहे. मात्र, नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या पुर्वसंधेला हलवा वाटला. परंतु, त्यामध्ये एकही ओबीसी, दलित, आदिवासी पाहायला मिळाला नाही. तुम्हीच सगळा हलवा खायला लागलात या वर्गाला काही मिळेल की नाही असा प्रश्न विचारताच अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना हसू आले आणि त्यांनी थेट डोक्यालाच हात लवाला.

करदात्यांसाठी मोठी बातमी! परदेशात जाण्यासाठी आयकर विभागाचं ‘हे’ प्रमाणपत्र असणार बंधकारक

पेपरफुटीवर शब्द नाही

राहुल गांधी म्हणाले, बजेटमध्ये इंटर्नशिप दिली आहे. मात्र, त्याचा देशातील ९९ टक्के तरुणांना या कार्यक्रमाचा कोणताही लाभ मिळणार नाही असा थेट सुलासा राहुल गांधींनी यावेळी केला. अर्थसंकल्पीय भाषणाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पेपर फुटीबद्दल काहीही बोलल्या नाहीत. परंतु, पेपरफुटी हा तरुणांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

follow us