Navjot Singh Sidhu : सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीविरोधात कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. माहितीनुसार, छत्तीसगड सिव्हिल सोसायटीने (Chhattisgarh Civil Society) सिद्धू दाम्पत्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
छत्तीसगड सिव्हिल सोसायटीने कॅन्सर उपचाराबाबत कागदपत्रे 7 दिवसांत सादर करून माफी मागावी अन्यथा 850 कोटींची नुकसान भरपाईचा दावा करण्यात येणार असं या नोटीसमध्ये म्हटले आहे. माहितीनुसार, छत्तीसगडच्या नागरी समाजाचे संयोजक डॉ. कुलदीप सोलंकी यांनी सिद्धू दाम्पत्याला 850 कोटींची कायदेशीर नोटीस बजावली आहे. सिद्धू दाम्पत्य देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. असा दावा डॉक्टर सोलंकी (Kuldeep Solanki) यांनी केला आहे. चौथ्या स्टेजवरचा कर्करोग आयुर्वेदिक पद्धतीने बरा होऊ शकतो हे चुकीचे असून त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी. असं माध्यमांशी बोलताना डॉक्टर सोलंकी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय
नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu)यांनी काही दिवसांपूर्वी स्टेज 4 कॅन्सरवर मात केली आहे. याबाबत स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांनी माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत कौर सिद्धू यांना स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते आणि त्यांनी उपचारासाठी आयुर्वेदाची मदत घेतली. अशी माहिती सिद्धू यांनी दिली होती.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले होते की, डॉक्टरांनी कॅन्सरपासून माझ्या पत्नीला पूर्णपणे मुक्त घोषित केले आहे. 2 वर्षांपूर्वी नवज्योत कौर सिद्धू यांना स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते आणि त्यानंतर त्याची जगण्याची शक्यता फक्त 3% आहे असं डॉक्टरांनी सांगितले होते मात्र तरीही देखील आम्ही डाईट करून आणि आयुर्वेदाची मदत घेऊन कॅन्सरवर मात केली.
पुढे बोलताना सिद्धू म्हणाले होते की, नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅन्सरवर मात करण्यासाठी अधूनमधून उपवास करत होती. ज्यामध्ये ती संध्याकाळी 6-7 च्या दरम्यान जेवण करत होती आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता काहीतरी खात होती. जेवण दरम्यान 16 तासांचे हे अंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात खूप उपयुक्त ठरले असा दावा नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला होता. मात्र आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.