क्रिकेट सोडलं अन् बनले पक्के राजकारणी; ‘या’ खेळाडूंची ‘पॉलिटिक्स’ इनिंगही गाजली

क्रिकेट सोडलं अन् बनले पक्के राजकारणी; ‘या’ खेळाडूंची ‘पॉलिटिक्स’ इनिंगही गाजली

Indian Cricket : क्रिकेट अन राजकारणाच नातं तसं घट्टच (Indian Cricket) आहे. क्रिकेटमधील खेळाडू खेळातून संन्यास घेतल्यानंतर पक्के राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, नवज्योसिंग सिद्धू ही अलीकडील उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. खेळाडूंची लोकप्रियता कॅच करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांना राजकारणाच्या मैदानात उतरवत असतात. राजकारणाच्या इनिंगमध्ये काही खेळाडू मास्टरब्लास्टर ठरतात तर काही खेळाडू मात्र सपशेल अपयशी ठरतात. आताही या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा भाजपमध्ये येणार आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपाच्या तिकीटावर गुरुदासपूरमधून लढणार, अशी तयारी सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राजकारणातील खेळाडूंची माहिती देणार आहोत. ज्यांनी क्रिकेटचे मैदान सोडल्यानंतर राजकारणातही आपला जम बसवला तर काही जण मात्र राजकारणातून बाद झाले.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून सचिनकडे (Sachin Tendulkar) पाहिले जाते. क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. या विक्रमाच्या जवळपासही कुणी फिरकू शकत नाही असे काही विक्रम सचिनच्या नावावर आहेत. क्रिकेट नंतर सचिनने राजकारणातही पाऊल ठेवलं. एप्रिल 2012 मध्ये त्याने राज्यसभा सदस्यत्व स्वीकारले. मे मध्ये राज्यसभेचा खासदार म्हणून शपथ घेतली.

यशस्वी जैस्वालला द्विशतकांचा डबल फायदा, कसोटी क्रमवारीत मोठी झेप; टॉप-5 मध्ये 3 भारतीय

कीर्ती आझाद

राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे कीर्ती आझाद. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या विजयी संघात कीर्ती आझाद होते. 7 कसोटी आणि 25 वनडे सामने खेळणाऱ्या कीर्ती आझाद यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. भाजपने त्यांना तिकीट दिले आणि कीर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांचे वडील बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे कीर्ती आझाद राजकारणात आले तरी त्याची फार चर्चा झाली नाही.

चेतन चौहान

क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर चेतन चौहान यांनी राजकारणात नशीब आजमावले. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून 1991 आणि 1998 च्या निवडणुकीत विजयी झाले. सध्या चेतन चौहान पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्या अमरोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

नवज्योसिंग सिद्धू

क्रिकेटप्रमाणे राजकारणात सुद्धा नवज्योसिंग सिद्धू यांची कारकीर्द गाजत आहे. सन 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकीत सिद्धू यांनी विजय मिळवला. या दोन्ही वेळेस भाजपने त्यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट दिले होते. यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यकाळात सिद्धू कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.

गौतम गंभीर

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणात नवीन इनिंग सुरू केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्ली मतदारसंघात त्याने भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द वादानेच जास्त गाजली. गौतम गंभीर जितका चांगला खेळाडू होता तितकाच तो रागीटही होता. त्यामुळे क्रिकेटमधील दिग्गज असो की सिनियर त्याने कुणालाच सोडलं नाही.

भारतीय क्रिकेटच्या 5 खेळाडूंचं ‘बॅडलक’; नशीबानं साथ सोडली, अज्ञातवासातच संपलं करिअर

विनोद कांबळी

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सगळेच ओळखतात. सन 2009 मध्ये विनोदने लोक भारती पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते. मात्र येथे त्याला पराभूत व्हावे लागले. यानंतर विनोद कांबळीने राजकारणाचा विचार डोक्यातून काढून टाकला.

एस. श्रीसंत

आयपीएल मधील फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या करियरला ब्रेक लागला. यानंतर तो रियालिटी शोमध्ये दिसला होता. येथून पुढे त्याने राजकारणात एन्ट्री घेतली. 2016 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने श्रीसंतला उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत त्याचा पराभव झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज