Download App

नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान खान यांना धोबीपछाड

Nawaz Sharif : नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी मरियम पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. मरियम नवाज शरीफ यांना दोन तृतीयांश म्हणजेच एकूण 220 मते मिळाली असून इम्रान खान यांना धोबीपछाड दिला आहे. मरियम शरीफ आता पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी इम्रान खान यांच्या पीटीआयला पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सुन्नी इत्तेहाद परिषदेने या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासात महिला मुख्यमंत्री निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?, राऊतांची बोचरी टीका

याआधी निवडणुकीत मरियमचा पक्ष पीएमएल-एनने लष्कराच्या मदतीने निवडणूकीत विजय मिळवला होता. मतदान बहिष्कारामुळे मरियम यांचे विरोधक सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे नेते राणा आफताब अहमद यांना एकही मत मिळाले नाही. त्याआधी पाकिस्तानचे तीन वेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझच्या ज्येष्ठ नेत्या मरियम नवाज यांनी रविवारी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता.

Vijay Wadettiwar : राज्याला खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सुरू, चहापानाला जाऊन पापाचे वाटेकरी होणार नाही

पंजाब प्रांत पाकिस्तानात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी मरियम नवाझ शरीफ यांचे अर्ज सादर करण्यात आले आहेत, असे पीएमएल-एनने ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या 1.2 कोटींहून अधिक आहे. पंजाब विधानसभेत एकूण 337 निवडून आलेले आमदार आहेत.

कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात

दरम्यान, या निवडणुकीत इम्रान यांच्या पीटीआय पक्षाने ‘सुन्नी इत्तेहाद कौन्सिल’शी हातमिळवणी केली होती. SIC-PTI आमदारांनी “आदेश चोर” च्या घोषणा दिल्या होत्या. कोर्टाने या प्रकरणी निकाल दिल्यावर आपण सरकार स्थापन करू, असे ते म्हणाले. आपल्या मुलीची राजकीय कारकीर्द पुढे नेण्यासाठी नवाझ शरीफ यांनी पंजाबचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. नवाझ शरीफ यांच्या जागी लष्कराने शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी बढती दिली आणि नवाझ शरीफ यांना पंतप्रधान होण्यासाठी आपली पावले मागे घ्यावी लागली, असे मानले जाते.

follow us

संबंधित बातम्या