Sharad Pawar On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे दोन नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते.
त्यानंतर आज भोपाळमध्ये मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जवळपास 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे मोदींनी म्हटले. या आरोपांवर शरद पवार काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पवारांनी पंतप्रधान मोदींच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा
पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना आज देशासमोर ठेवला” असे म्हणत पवारांनी मोदींना खास पुणेरी टोमणा लगावला. ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला, मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो, मी कधी लोन घेतले नव्हते, मी त्या संस्थेचा सदस्य कधीच नव्हतो, असे पवारांनी स्पष्ट केले.”
“नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही, हे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहित आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्या बाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची विधाने केली जातात, यापेक्षा अधिक बोलण्याची आवश्यकता नाही असे म्हणत पवारांनी मोदींना सुनावले”.
शरद पवारांची ‘ती’ मुत्सद्देगिरी ते ठाकरेंचं बंद दार; देवेंद्र फडणवीसांनी सगळंचं बाहेर काढलं…
दरम्यान, नरेंद्र मोदींनी आज पवारांवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पक्षावर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी यांची मोठी यादी आहे, असे मोदी म्हणाले.