Download App

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट; पडद्यामागं नेमकं काय घडतंय?

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

Sharad Pawar Meeting with PM Modi : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मंत्रिपदावरून नाराजी नाट्य सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहेत. महाविकास आघाडीतही धुसफूस सुरू आहे. या घडामोडी घडत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आज शरद पवार पीएम मोदींची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

राजकारण फिरलं! सभापतीपदासाठी राम शिंदे कन्फर्म, अर्ज भरणार; शिंदेसेनेत अस्वस्थता

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. साहित्य परिषदेचे निमंत्रण देण्याच्या उद्देशाने पीएम मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तरीही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामागे कारणही आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही राज्यात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. त्यातच काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती.

या भेटीआधी अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. राजकीय कारण नाही असं सांगितलं जात असलं तरी राजकीय चर्चा होणार नाही असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. त्यामुळे आता या पीएम मोदी आणि शरद पवार यांच्या संभाव्य भेटीकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानं विरोधकांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे आता ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून काही नवी समीकरणे उदयास येतात का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार यांनी पीएम मोदींची भेट घेतली. यावेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्याबरोबर होते. या भेटी दरम्यान शेतरकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा केली. डाळिंब पिकाशी संबंधित ही भेट होती अशी माहिती शरद पवारांनी दिली.

follow us