राजकारण फिरलं! सभापतीपदासाठी राम शिंदे कन्फर्म, अर्ज भरणार; शिंदेसेनेत अस्वस्थता
Maharashtra Politics : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधानपरिषदेचा सभापती कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जसं नाराजीनाट्य दिसलं त्याच पद्धतीने सभापती पदावरूनही नाराजी उफाळून येऊ लागली आहे. या पदासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे नाराज झाल्या आहेत. तर दुसरीकडे सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव जवळपास कन्फर्म केलं आहे. भाजपाच्या या खेळीमुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
विधानपरिषदेचे सभापती पद हे शिवसेनेला मिळणार आणि सभापती नीलम गोऱ्हेच होणार अशी मागणी शिंदे गटाने केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यानंतरही भाजपकडून राम शिंदे यांच्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विधानपरिषदेचे सभापती देऊन विधानसभेप्रमाणेच हे पदही आपल्याच ताब्यात राहिल असे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपने आता राम शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं असून शिंदे लवकरच अर्ज भरतील अशी माहिती आहे.
‘या’ दिवशी होणार विधान परिषद सभापती निवडणूक, भाजपकडून राम शिंदेंना संधी?
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना सभापतीपदाची पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचा दावा शिवसेनेकडून (Shiv Sena) करण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना अध्यक्षपदासाठी संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत तर सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राम शिंदेंचं राजकीय पुनर्वसन
या पदासाठी भाजपकडून राम शिंदे यांचं नाव जवळपास फिक्स झालं असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, भाजपकडून विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. अगदी थोड्या मतांच्या फरकाने रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता राम शिंदे यांना विधानपरिषदेचं सभापती पद देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचाही उद्देश यामागे असू शकतो.
महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी
विधानपरिषदेतील संख्याबळ
रामराजे नाईक-निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. सभागृहातील ७८ सदस्यांपैकी भाजपचे १९, काँग्रेसचे ७, शिवसेना (ठाकरे गट) ७ , शिवसेना (शिंदे गट) ६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे) ५–५ सदस्य आहे. तर ३ अपक्ष सदस्य आहेत.