हिंडेनबर्ग प्रकरणात उद्योजक गौतम अदानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाजू घेतली होती. त्यामुळे काँग्रेस व इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे.
‘गंगा भागीरथी’वरुन भाजपमध्ये मतभेद, चित्रा वाघ यांनी सुचविला दुसरा शब्द
खर्गे यांच्या घरी ही बैठक झाली आहे. या बैठकीत विरोधकांमध्ये एकजुट मजबूत करण्याबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपालही उपस्थित होते.
राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ? संजय राऊतांचा दावा
देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र, तरुणांसाठी रोजगार, महागाई, केंद्रीय एजन्सींचा दुरुपयोग या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी एकत्र होऊन लढणार आहे. सर्व विरोधकांबरोबर याबाबत चर्चा करणार आहे. शरद पवार यांचेही हेच मत आहे, असे खर्गे यांनी बैठकीनंतर जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोन दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. सर्व विरोधकांनी देशासाठी एकत्र यावे, असे आवाहन नितीशकुमार यांनी केले होते. त्यानंतर नितीशकुमार यांनी सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांची भेट घेतली होती.