राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ? संजय राऊतांचा दावा

  • Written By: Published:
राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ? संजय राऊतांचा दावा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांवर इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबावतंत्र सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत, असे राऊत यांनी सांगितले.

वरळी की ठाण्यातून आमदार होणार ? आदित्य ठाकरे म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबावतंत्र सुरू आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ हसन मुश्रीम यांच्यावर इडीचा प्रचंड दबाव आहे. शिवसेनेचे झाले तसे राष्ट्रवादी, काँग्रेस आमदारांबाबत सुरू असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ; Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’

याबाबत आता आम्हाला संघर्ष करायचा आहे आहे. मी, अनिल देशमुख यांनी जेलमध्ये जावून हे भोगल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. काही झाले तरी संघर्ष करायचा असे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकमत झाले आहे.

राज्यातील वातावरण बदलले आहे.आता सोडून कोणी जाणार नाही, याचा विश्वास आहे. पण जे सोडून त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, असे राऊत म्हणाले. अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत आहे. केवळ महाराष्ट्रातून मुंबईत तोडण्यासाठी ते येत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube