सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ; Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’

  • Written By: Published:
सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ;  Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’

Aaditya Thackeray On Eknath Shinde : ज्या माणसांवर विश्वास ठेवला ते आम्हाला सोडून निघून गेले. ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्याबरोबर राहिले आहेत. आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार आहे. जेवढे आमदार, खासदार सोडून गेले आहेत. त्याच्या डबल खासदार, आमदार निवडून आणणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. या लोकांना नगरेसवक ते मंत्री आम्ही केले आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर त्यांनी पक्ष, चिन्ह चोरले आहे. त्यानंतर आम्हाला शिव्या देत आहे. अशा माणुसकीवर विश्वास ठेवायचा का ?, चाळीस लोकांची गँग सोडून गेली असली तरी देशभरातील लोकांचे वेगळे प्रेम आम्हाला मिळत असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटत नव्हते हे सांगणे चुकीचे आहे. ते सर्वांना भेटत होते. आमदारांना निधी दिला आहे. त्याची यादी वाचून दाखविले आहे. मातोश्रीवर येणाऱ्यांची नावे पोलीस लिहून ठेवतात. पोलिसांची डायरी आता दाखवावे लागेल का , असा टोलागी ठाकरे यांनी लगावला आहे.

पंकजा मुंडेंचा मतदारसंघ ठरला…

मुख्यमंत्र्यांनी, चाळीस आमदारांना राजीनामा देऊन निवडून यावे पण ते तसे करणार नाही. ते निवडून येऊ शकत नाही. कारण त्यांनी पोलिस, आयबीकडून तसा अहवाल मागविला असेल, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

मंत्र्यांच्या हवाई पाहणीवर मुंबई हायकोर्टाने ओढले ताशेरे
भाजप व आमचे हिंदुत्व वेगळे आहे. हिंदुत्वाचा वापर ते राजकारणासाठी करत आहेत. ह्रदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. दंगल घडविण्याचे हिंदुत्व आमचे नाही. सरकारने रोजगार, वाढत्या महागाईकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube