मंत्र्यांच्या हवाई पाहणीवर मुंबई हायकोर्टाने ओढले ताशेरे

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 13T183014.719

Mumbai High Court On Mumabi Goa Highway :  सध्या कोणत्याही समस्येची पाहणी हे हवाई पद्धतीने करण्याची फॅशन आली आहे, असे मत मुंबई उच्चन्यायालयाने व्यक्त केले आहे. गेल्या 13 वर्षापासून मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले आहे. हा चौपदरी महामार्ग असून याचे काम केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. सध्या रस्ता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला आहे.

नुकतंच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याची पाहणी केली आहे. अजूनही या कामाची डेडलाईन पूर्ण झालेली नाही. यावरुन हायकोर्टाने आपले मत व्यक्त केले आहे. राज्य सरकारने मनात आणले तर या महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्याचे काम काही दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Letsupp Special : Ajit Pawar यांचा स्पष्टवक्तेपणा अशा वेळी कोठे जातो?

या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कोकणातील असलेले वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली.

Pankaja Munde या धनंजय मुंडेंना सोपे सोडणार नाही… परळीतूनच लढणार !

आम्हाला प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने मनात आणले तर काही दिवसांतच त्याठिकाणी ट्रॉमा सेंटर उभे राहील, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच याबाबत राज्य सरकारने आपले मत लवकरात लवकर व्यक्त करावे असेही न्यायालयाने सांगितले आहे व सुनावणीसाठी 7 जून ही पुढील तारीख दिली आहे.

Tags

follow us