वरळी की ठाण्यातून आमदार होणार ? आदित्य ठाकरे म्हणतात…

  • Written By: Published:
फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण...

Aditya Thackeray : आगामी काळात आदित्य ठाकरे हे वरळीतून की ठाण्यातून निवडणूक लढवणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थान असे उत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले की, मी वरळी आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी त्याबाबत ठाणेकरांना देखील विचारले आहे.

‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘राजकीय गप्पा’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.

ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात : ते ५० खोके, ५० आमदारांचाच, तर मी ५० वर्षांचा विचार करतो! – Letsupp

आदित्य ठाकरे म्हणाले की, मिंध्ये गटाच्या नेतृत्वाला वरळी आणि ठाणे या दोन्ही मतदार संघात मी आव्हान दिले आहे. पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोपर्यंत आमदारकी राहते की जाते, हे पाहावे लागेल.

एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर मग मात्र निवडणूक लढवण्यास काहीच मज्जा राहणार नाही. त्यामुळे त्यांची आमदारकी राहावी आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी करावी, मगच मज्जा येईल, असे मिस्कील उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे.

Tags

follow us