Download App

भाजपसाठी गुडन्यूज! काँग्रेसला झटका देत ‘हा’ मोठा पक्ष करणार घरवापसी

Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात फिरत आहेत. विरोधकांचा हा डाव लक्षात घेत केंद्रातील सत्ताधारी भाजपनेही एनडीएचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भाजपपासून दूर गेलेले त्याचे मित्रपक्षांना पुन्हा एनडीएत आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसमचे (TDP) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सुद्धा उपस्थित होते.

हे ही वाचा  .. म्हणून शरद पवारांनी सांगितली लालबहादूर शास्त्रींची आठवण!

भाजप आणि तेलुगु देसम यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही भेट झाली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त तेलंगाणातही दोन्ही पक्षांनी युती करण्याबाबत शक्यता तपासून पाहिल्या. भाजपने सध्या तेलंगाणा या राज्यावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. कारण, या राज्यात भाजपने स्थानिक निवडणुकांत चांगले यश प्राप्त केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाल्यानंतर विशेष दर्जा देण्याची मागणी करत 2018 मध्ये नायडू यांनी भाजपबरोबरील युती तोडली होती. आता मात्र नायडू निवडणुकीतील तडजोडींसाठी इच्छुक आहेत. मात्र, राज्यातील काही भाजप नेत्यांनी याला विरोध केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नायडू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका आणि काँग्रेसबरोबरील त्यांची वर्तणूक या कारणांचा हवाला भाजप नेते देत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भाजप नेतृत्वाने दक्षिणेतील आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसला जोरदार टक्कर देण्याचा भाजपाचा इरादा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ! सचिन पायलट अखेर ‘तो’ निर्णय घेण्याच्या तयारीत

टीडीपीबरोबरील युतीसंदर्भात अमित शाह यांना विचारले असता त्यांनी नकार दिला होता. पण, मागील वर्षापासून नायडू यांनी अनेक वेळा दिल्ली दौरा केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. टीडीपीने मागील वर्षात झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता.

Tags

follow us