Download App

नीट परीक्षांच्या गोंधळात शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा; माजी इस्त्रो प्रमुखांवर दिली मोठी जबाबदारी

नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरातून टीकेची झोड उठवली जात आहे.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत देशभरात निदर्शने सुरू असून, सरकारने NEET परीक्षा रद्द करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या सर्व तापलेल्या वातावरणात शिक्षण मंत्रालयाने देशातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सा सदस्यीय तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती जाहीर केली आहे. या समितीचे नेतृत्त्व माजी इस्त्रो प्रुमख डॉ. के राधाकृष्णन करणार असून, या समितीत एम्सचे  माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे. (Centre Setsup High Level Panel In Amid NEET, UGC-NET Row)

माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सात सदस्यीय पॅनेलचे नेतृत्व करणार असून, ही समिती परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी काम करणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करणे, डेटा सुरक्षा मजबूत करणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कामकाजावर शिफारशी सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ही समिती त्यांचा अहवाल 2 महिन्यांच्या आत शिक्षण मंत्रालयाला सादर करणार असून, ज्यामध्ये परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि प्रक्रिया न्याय्य करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश असेल असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा

स्थापन करण्यात आलेल्या समितीत कोण कोण?

शिक्षण मंज्ञालयाने देशातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्त्व इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के राधाकृष्णन करणार असून, या समितीत दिल्ली AIIMS माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह 7 तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

NEET Result: एनटीएचे मोठे अधिकारी आता आले रडारवर ! शिक्षणमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

समितीतील सदस्य कोण?

follow us