Arvind Kejriwal : राजधानी नवी दिल्लीत आज कडाक्याच्या उन्हाळ्यात हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले जात असल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत. निवडणुकीनंतर पक्षाचे बँक खाते गोठवले जातील. पंतप्रधानांनी आम आदमी पक्षाला संपवण्याचा विडाच उचलला आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी आप पक्ष संपवण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यांना आणि आम्हाला ओळखणाऱ्या काही जणांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ज्यावेळी पंतप्रधानांना भेटलो त्यावेळी ते म्हणाले की आम आदमी पार्टीवाले खूप वेगाने पुढे चालले आहेत. आगामी काळात आम आदमी पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांना असं वाटतं की या पक्षाला तत्काळ संपवलं पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.
उद्या दुपारी आम्ही BJP च्या मुख्यालयात येतोय, हिंमत असेल…; केजरीवालांचं मोदींना आव्हान
माजी सचिव बिभव कुमार यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन आता संपले आहे. उपस्थितांना संबोधित केल्यानंतर केजरीवाल पक्ष कार्यालयात परतले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा भाजपाच्या कार्यालयाकडे जायला सुरुवात केली तेव्हा केजरीवाल यांना पोलिसांनी दीन दयाल उपाध्याय मार्गावरच रोखले. यानंतर पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
भविष्यात भाजपला कोणतेही आव्हान निर्माण होऊ नये यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. पक्षाचे बँक खाते गोठवले जातील आणि पक्ष कार्यालये खाली केली जातील. अशा पद्धतीने पक्षाला काही तरी करुन रस्त्यावर आणले जाईल. त्यांना वाटतंय की पक्षाला संपवून टाकू. ठीक आहे मग मीच येतो तुमच्या पक्ष कार्यालयात. तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच अटक करा. भाजपवाले म्हणतात की राघव चढ्ढा आलेत तर त्यांनाही अटक केली जाईल. ठीक आहे मग तु्म्ही आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनाही अटक करा असे केजरीवाल म्हणाले.
Arvind Kejriwal तुरूंगात वाचू इच्छित असलेले ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ पुस्तकात नेमकं काय?
खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अरविंद केजरीवाल यांचे माजी खासगी सचि विभव कुमार यांना शनिवारी अटक करण्यात आली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी काल भाजपाच्या कार्यालयावर मोर्चाने येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज दुपारी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
परंतु, या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे मग पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करत केजरीवाल यांनी दीनदयाल मार्गावरच रोखले. येथून पुढे जाऊ दिले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आम आदमी पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी येथेच धरणे देत आंदोलनाला सुरुवात केली होती.