New GST Rates Effective From Tomorrow : देशातील करप्रणालीत मोठा बदल होत आहेत. 22 सप्टेंबर 2025 पासून GST 2.0 लागू होणार आहे. या सुधारित योजनेत दोन मुख्य करस्लॅब असतील – 5% आणि 18%, तर तंबाखू आणि दारूसारख्या अपायकारक उत्पादनांवर 40% विशेष कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील GST परिषदेच्या निर्णयानंतर हे बदल लागू होत आहेत.
या बदलांचा उद्देश कररचना सोपी करणे, ग्राहकांची खरेदी क्षमता वाढवणे आणि व्यवसाय अधिक पारदर्शक करणे हा आहे. मात्र अनेक व्यापारी, ग्राहक आणि विमा धारकांमध्ये अजूनही प्रश्न आहेत. ते आपण एकेक करून पाहूया.
GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर. यानेच उत्पादन शुल्क (New GST), व्हॅट आणि सेवा करासारखे जुन्या प्रकारचे कर हटवले गेले. आता संपूर्ण देशभर एकसमान अप्रत्यक्ष कर (Tax Rules) प्रणाली लागू झाली आहे.
22 सप्टेंबर 2025 पासून नवीन दर देशभरात लागू होतील. त्यानंतर वस्तू आणि सेवांवर लागू होणारे दर एकसमान आणि सोपे असतील.
– दोन मुख्य करस्लॅब – ५% आणि १८%
– अपायकारक वस्तूंवर – ४०% कर
– ग्राहकांना स्वस्तात दैनंदिन वस्तू, तर सरकारला जास्त महसूल या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न
– जर पुरवठा व पेमेंट 22 सप्टेंबरपूर्वी झाले असतील, तर जुने दर लागू होतील.
– पुरवठा 22 सप्टेंबरनंतर झाला, तर नवीन दर लागू होतील, जरी स्टॉक जुना असेल तरी.
– आधी भरलेला इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वैध राहील, त्यावर परिणाम होणार नाही.
जीवन विमा पॉलिसी – टर्म प्लॅन, एंडोमेंट्स, युलिप यांना सूट मिळेल.
आरोग्य विमा पॉलिसी – फॅमिली फ्लोटर व ज्येष्ठ नागरिक योजना करमुक्त असतील.
मात्र कमिशन व ब्रोकरेज करपात्र राहतील.
रस्ते प्रवास – 5% (आयटीसीशिवाय), किंवा 18% (आयटीसीसह).
विमान प्रवास – इकॉनॉमी क्लासवर 5%, इतर वर्गांवर 18%.
विमान प्रवास नसेल तर 5% कर (मर्यादित आयटीसी).
विमान प्रवास असेल तर 18% कर (पूर्ण आयटीसी).
– नोंदणीकृत पुरवठादार स्वतः कर भरतील.
– नोंदणी नसल्यास ई-कॉमर्स ऑपरेटरवर कराची जबाबदारी असेल.
– स्थानिक डिलिव्हरी सेवांवर 18% कर लागू राहील.
– औषधांवर 5% कर कायम राहील; पूर्ण सूट दिल्यास उत्पादन खर्च वाढण्याचा धोका.
– कृषी यंत्रसामग्रीवर सवलतीचा दर ठेवण्यात आला आहे, शेतकऱ्यांचा फायदा लक्षात घेऊन.
– कच्च्या कापसावर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम चालू राहील.
– फेस पावडर, शाम्पूसारख्या वस्तूंवरील कर कमी केला गेला आहे.
– दूध करमुक्त, पण सोया/बदाम दूधासारख्या वनस्पती-आधारित पेयांवर 5% कर.
– नकली जरी (मेटालाइज्ड प्लास्टिक फिल्म) वरील परतफेड बंद करण्यात आली आहे.
– 22 सप्टेंबरपूर्वीचा स्टॉक परत मागवण्याची गरज नाही.
– फक्त नवीन किंमत यादी जाहीर करावी लागेल.