मेटाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी Facebook Account बंद; कारणही धक्कादायक

मेटाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी Facebook Account बंद; कारणही धक्कादायक

Meta Deleted Facebook Account : मेटाने एका मोठ्या कारवाईची माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक (Meta Deleted Facebook Account) केले आहेत. या अकाउंटद्वारे बनावट प्रोफाइल तयार करून चालवले जात होते. कंपनीने मागील सहा महिन्यांच्या काळात ही कारवाई केली आहे. या कारवाईला कंपनीने Spammy Content असे नाव दिले आहे. खरंतर ‘फेसबूक फीड’ला अधिक पारदर्शक, स्वच्छ आणि विश्वासार्ह करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. सध्याच्या एआयच्या काळात (Artificial Intelligence) कंपनीची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

कंपनीने याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की हे फेक अकाउंट फेसबूकचे अल्गोरिदम आणि ‘ऑडीयन्स रीच’चा फायदा घेऊ इच्छित होते. यासाठी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्सच्या अकाउंट्सची डुप्लीकेसी (नक्कल) करण्याचा प्रयत्न करत होते. कंपनीने या व्यतिरिक्त पाच लाख अकाउंटही ब्लॉक केले आहेत. या खात्यांद्वारे गैरप्रकार केले जात असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले होते. कमेंट स्पॅम, बॉट सारखी एंगेजमेंट आणि कंटेंट रिसायक्लिंग यांसारख्या प्रकारात या अकाउंट्सचा समावेश होता.

सावधान! फेसबूक, ईमेल अन् कॉम्प्यूटर.. आयकर विभाग सगळंच तपासणार, पण का?

ओरिजिनल कंटेंटला मिळणार रिवॉर्ड

मेटाने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की कंपनीने ओरिजिनल कंटेंट क्रिएटर्स (Content Creators) स्पेशली यूनिक इमेज किंवा व्हिडिओ तयार करणाऱ्या क्रिएटर्सना रिवॉर्ड देण्याची योजना आखली आहे. याचबरोबर डुप्लीकेट कंटेंटचा शोध घेण्यासाठी आणि त्याचे रीज कमी करण्यासाठी एका खास टेक्निकचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कंपनी आगामी काळात काय करणार याची उत्सुकता आहे.

AI बाबतीतही कंपनीची खास तयारी

कंपनी एआय तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी तयारी करत आहे. याच वेळी कंपनीने सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाईही केली आहे. कंपनीचे सीईओ मार्क जकरबर्ग यांनी सुपर कंप्यूटिंग कॅपेबिलिटीज आधिक विस्तारीत करण्यासाठी आणि पुढील वर्षात AI सुपर क्लस्टर लाँच करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याची प्लॅनिंग केली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीकडून तंत्रज्ञानात अधिक बदल झालेले दिसतील.

काय सांगता? गुगल चष्मा देणार प्रश्नांची उत्तरे, थेट मेटाशी स्पर्धा करण्याची तयारी़

दरम्यान, यूट्यूबनेही अलीकडेच नियमांत मोठा बदल केला आहे. मुलांची सुरक्षितता तसेच व्हिडिओ कंटेंटच्या बाबतीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यातील काही नियमांची अंमलबजावणी आजपासूनच सुरू होणार आहे. यूट्यूबची पॅरेंट कंपनी गुगलने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ऑनलाइन सुरक्षितता आधिक चांगली करण्यासाठी मेटाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube