काय सांगता? गुगल चष्मा देणार प्रश्नांची उत्तरे, थेट मेटाशी स्पर्धा करण्याची तयारी

काय सांगता?  गुगल चष्मा देणार प्रश्नांची उत्तरे, थेट मेटाशी स्पर्धा करण्याची तयारी

Event AI Enabled Smart Glasses Unveiled In Google Event : गुगल आय/ओ 2025 कार्यक्रमादरम्यान (Google Android) अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीचे एआयवर लक्ष केंद्रित झाल्याचे या कार्यक्रमादरम्यान दिसून आले. मेटाशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने (Google Event) या कार्यक्रमादरम्यान अँड्रॉइड एक्सआर ग्लासेसचे प्रदर्शन देखील केले. कंपनीने स्मार्ट चष्म्यांमध्ये जेमिनी एआयचा (AI Smart Glasses) वापर केला आहे. हे स्मार्ट चष्मे घातलेले दोन गुगल प्रतिनिधी एकमेकांशी हिंदी आणि फारसीमध्ये बोलत असल्याचे दिसून आले, एआयने त्यांना एकमेकांची भाषा समजण्यास मदत केली आणि संभाषण इंग्रजीत भाषांतरित केले.

काय सांगता! फक्त तांदळावर काय बोलले मंत्र्याची खुर्चीच गेली; जपानमध्ये नेमकं काय घडलं?

या स्मार्ट चष्म्यांमध्ये एआयची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे चष्मा वापरकर्त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खूप चांगले देतात. गुगलने अँड्रॉइड एक्सआरची घोषणा देखील केली, जो क्वालकॉम आणि सॅमसंगच्या सहकार्याने विकसित केलेला कंपनीचा पहिला प्लॅटफॉर्म आहे.

हे प्लॅटफॉर्म केवळ स्मार्टफोनच्या गरजा पूर्ण करणार नाही, तर गुगलचे म्हणतंय की लोकांना स्मार्टग्लासेसमध्येही अँड्रॉइड एक्सआरची वैशिष्ट्ये मिळतील. यावर्षी प्रोजेक्ट मोहनसह अँड्रॉइड एक्सआर उपलब्ध होणार आहे. सध्या या चष्म्यांच्या किंमतीबद्दल कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत, परंतु लवकरच या चष्म्यांची किंमत उघड होण्याची अपेक्षा आहे.

Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची! मुंबईत आज बैठक; ‘मविआ’ नेत्यांना डावललं…

गुगल आयओ म्हणजे काय?
गुगल आयओ ही प्रत्यक्षात गुगल डेव्हलपर कॉन्फरन्स आहे, जी दरवर्षी मे आणि जूनमध्ये आयोजित केली जाते. या कार्यक्रमाद्वारे गुगल दरवर्षी जगाला सॉफ्टवेअर अपडेट्स आणि नवीन प्रकल्पांबद्दल माहिती देते.या कार्यक्रमात ही वैशिष्ट्ये सादर करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान केवळ स्मार्ट ग्लासेसच नाही तर गुगलने गुगल बीम देखील सादर केले, जे एचपीच्या सहकार्याने लाँच केले जाणार आहे. ते एक व्हिडिओ कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. याशिवाय, कंपनीने गुगल मीटमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन फीचरसाठी सपोर्ट देखील जोडला आहे. एवढेच नाही, तर कंपनीने व्हिडिओ जनरेशन प्लॅटफॉर्म VO, VO3 चे नवीनतम आवृत्ती सादर केले आहे, जे नेटिव्ह साउंड सपोर्टसह येईल. याद्वारे व्हिडिओ बनवणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या