Download App

New Parliament Inauguration: ऑस्ट्रेलियाहून परतताच पंतप्रधानांचा विरोधकांना एकजुटीचा मंत्र

Amit Shah on Pandit Jawaharlal Nehru : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत देशात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतात परतले. ते जपान, पापुआ गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर होते. परत येताच पंतप्रधानांनी एकजुटीचे विधान केले आहे. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमादरम्यान सरकार आणि विरोधकही एकत्र होते.

पंतप्रधानांनी तीन देशांच्या दौऱ्यात अखेरची भेट ऑस्ट्रेलियाला दिली. यादरम्यान त्यांनी तेथील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. तेथे भारतीय समुदायाचा कार्यक्रमही होता, ज्यात अँथनी अल्बानीज आणि इतर नेते उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले की, भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात केवळ पंतप्रधान आणि सरकारचे सदस्यच सहभागी झाले नाहीत, तर माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटनापूर्वी काँग्रेससह 19 पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षांनी फेरविचार करावा अशी विनंती केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी केली जात आहे. या तयारीची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन इमारतीचे उद्घाटन करतील तसेच ‘सेंगोल’ (Sengol) संसदेच्या नवीन इमारतीत ठेवण्यात येईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सेंगोलचा किस्सा सांगितला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह की स्वातंत्र्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल ब्रिटिशांकडून घेतले होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाने ती ऐतिहासिक परंपरा पुन्हा जिवंत होणार आहे. सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरूंना जेव्हा विचारण्यात आले की, स्वातंत्र्याच्या वेळी सत्ता हस्तांतरणाचे चिन्ह काय असावे. त्या वेळी नेहरूजींनी कोणतेही तात्काळ उत्तर दिले नाही. यावर त्यांनी सी. गोपालाचारी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सी. गोपालाचारी यांनी सेंगोल सुचवले होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तामिळनाडूतून सेंगोल मागवून घेतले आणि ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरण केले.

मेटाकडून पुन्हा कर्मचारी कपात, तब्बल 10 हजार कर्मचार्‍यांची नोकरी जाणार

अमित शहा म्हणाले की, सत्ता हस्तांतरण म्हणजे केवळ हस्तांदोलन किंवा कोणत्याही कागदपत्रावर सही करणे असे नाही. आधुनिक गरजा लक्षात घेऊन त्याला स्थानिक परंपरांची जोड द्यायला हवी. जवाहरलाल नेहरूंना 14 ऑगस्ट 1974 रोजी वाटलेली भावना सेंगोल अजूनही दर्शवते. ते पुढं म्हणाले की, नवीन संसद भवन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. नवीन भारताच्या उभारणीसाठी आपला सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि सभ्यता यांना आधुनिकतेशी जोडण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे.

Tags

follow us