प्रवाशांना झटका! विमानतळांवर मोफत व्हीलचेअरसाठी द्यावे लागणार शुल्क; DGCA ने बदलले नियम…

व्हीलचेअर किंवा इतर मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांना त्यांच्या उड्डाणापूर्वी वेळेवर विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे.

  • Written By: Published:
प्रवाशांना झटका! विमानतळांवर मोफत व्हीलचेअरसाठी द्यावे लागणार शुल्क; DGCA ने बदलले नियम...

Airlines Can Now Charge For Wheelchair Services : विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मोफत व्हिलचेअरची सुविधा संपुष्टात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नियमात मोठा बदल केला आहे. त्यामुळे येथून पुढे विमानतळांवर व्हिलचेअरची सुविधांसाठी प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. हा बदल अशा लोकांसाठी करण्यात आला आहे जे कोणत्याही गरजेशिवाय मोफत व्हीलचेअर सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे जर तुम्हाला दिव्यांगत्व किंवा हालचाल करण्याची कोणतीही समस्या नसेल आणि तरीही, जर तुम्ही विमान प्रवासादरम्यान व्हीलचेअर वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर, या सेवेसाठी तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते.

डीजीसीएने नागरी विमान वाहतुकीचे नियम बदलले

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) मध्ये सुधारणा केली आहे. सुधारित नियमांनुसार, विमान कंपन्या आता शारीरिकदृष्ट्या अक्षम नसलेल्या किंवा हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या परंतु, तरीही व्हीलचेअर प्रवेशाची आवश्यकता असलेल्या प्रवाशांकडून सहाय्य शुल्क आकारू शकणार आहेत. प्रवाशांना शुल्काची जाणीव व्हावी यासाठी विमान कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर हे शुल्क स्पष्टपणे प्रदर्शित करतील असे DGCA ने स्पष्ट केले आहे.

विमान कंपनीच्या जबाबदाऱ्या आणि अहवाल देण्याच्या वेळेत बदल

नवीन नियमांनुसार, व्हीलचेअर किंवा इतर मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांना त्यांच्या उड्डाणापूर्वी वेळेवर विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. याबाबत DGCA ने म्हटले आहे की, वेळेवर मदत मिळावी यासाठी विमान कंपन्या त्यांच्या सोयीनुसार किमान रिपोर्टिंग वेळ निश्चित करू शकतात. मात्र, दिव्यांगत्व किंवा हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा पूर्वीप्रमाणेच मोफत असेल. विमान कंपन्यांनी अशा प्रवाशांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करावी असेही DGCA ने नमुद केले आहे.

दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष व्यवस्थेचे निर्देश 

डीजीसीएने विमानतळ संचालकांना दिव्यांग किंवा मर्यादित हालचाल करू शकणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळांवर विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. टॅक्सी किंवा खाजगी वाहनांनी येणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना सुविधा देण्यासाठी विमानतळांवर राखीव ड्रॉप-ऑफ पॉइंट्स तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, हे पॉइंट्स नेहमी रिकामे ठेवले जातील आणि व्हीलचेअर सहाय्य सहज उपलब्ध असेल याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, गरजूंना मदत डेस्कवर सहज प्रवेश मिळावा यासाठी विमानतळ टर्मिनल्सच्या आत आणि बाहेर स्पष्ट फलक आणि चिन्हे बसवली जातील.

हा निर्णय आताच का घेतला गेला?

डीजीसीएने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात व्हीलचेअर बुकिंगबाबत एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटर्सना अनेक तक्रारी आल्या होत्या. अनेक सक्षम प्रवासी अनावश्यकपणे या सेवेचा फायदा घेत होते, ज्यामुळे दिव्यांग प्रवाशांना वेळेवर मदत मिळू शकत नव्हती. त्यामुळे अखेर वैद्यकीय गरजेशिवाय व्हीलचेअर बुकिंग करणाऱ्यांकडून वाजवी शुल्क आकारण्याचा निर्णय डीजीसीएने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवाशांनी काय करावे?

आता, जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअर वापरायची असेल, तर त्यांना आगाऊ बुकिंग करावे लागेल आणि निर्धारित शुल्क भरावे लागेल. डीजीसीएच्या मते, या निर्णयामुळे विमानतळ सेवा अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होतील.

follow us