Download App

News Click Raid : ‘न्यूजक्लिक’ शी संबंधित पत्रकारांच्या घरी छापे; दिल्ली पोलिसांच्या कारवाईने खळबळ!

News Click Raid : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. या संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांचीही पोलिसांनी (Delhi Police) चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. चिनी फंडिंगच्या आरोपांनी आधीच ही वृत्तसंस्था घेरली गेली असताना ही कारवाई झाली आहे. दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास करताना न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पूरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.

Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD

मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक वृत्तसंस्थेशी संबंधित काही पत्रकारांच्या घरी छापे टाकले. या वृत्तसंस्थेला चीनकडून पैसे मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. जवळपास 34 कोटींचे फंडिंग झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. राजधानी दिल्लीशिवाय उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्येहा पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की पोलिसांनी वेबसाइटशी कथितपणे लिंक असलेल्या 30 हून आधिक ठिकाणी छापे टाकले. न्यूजक्लिकशी संबंधि विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांनी ट्विट करत आपल्यावरील कारवाईची माहिती दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापे टाकून त्यांचे मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केल्याचे या पत्रकारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संसदेच्या अधिवेशनातही न्यूजक्लिकचा मुद्दा गाजला

याआधी 7 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी न्यूजक्लिकला चिनी निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. शेजारी देशांच्या पैशाने आपल्या देशात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आल्याचे दुबे म्हणाले होते. शेजारील देशांतून बातम्यांच्या वेबसाइटवर पैसे आले. यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही काँग्रेस, चीन आणि वादग्रस्त न्यूज वेबसाइट न्यूज क्लिक एकाच नाळेने जोडले गेल्याचा आरोप केला होता.

खळबळजनक : जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; झोपेत असलेल्या चिमुरड्यांना अंथरुनातच घातल्या गोळ्या

Tags

follow us